CoronaVirus News: भारताला तातडीनं कोरोना लसींचा साठा अन् कच्चा माल पुरवा; अमेरिकन सरकारवर दबाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 02:54 PM2021-04-24T14:54:38+5:302021-04-24T14:55:21+5:30

CoronaVirus News: अमेरिका फर्स्ट म्हणणाऱ्या बाडयन प्रशासनावर दबाव वाढला; लवकरच निर्यातबंदी हटण्याची शक्यता

CoronaVirus News pressure mounts on joe biden to ship astrazeneca vaccine other medical supplies to india | CoronaVirus News: भारताला तातडीनं कोरोना लसींचा साठा अन् कच्चा माल पुरवा; अमेरिकन सरकारवर दबाव वाढला

CoronaVirus News: भारताला तातडीनं कोरोना लसींचा साठा अन् कच्चा माल पुरवा; अमेरिकन सरकारवर दबाव वाढला

Next

वॉशिंग्टन: अमेरिका फर्स्ट अशी भूमिका घेत भारताला कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यास असमर्थतता दर्शवणाऱ्या अमेरिकन सरकारवर दबाव वाढवा आहे. ऍस्ट्राझेनेकासह अन्य कोरोना लसी आणि जीवनरक्षक औषधं त्वरित भारताला पाठवण्याची मागणी यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सनं केली आहे. यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्स अमेरिकेतील शक्तिशाली संस्था मानली जात आहे. या संस्थेसोबतच काही अमेरिकन खासदार आणि प्रभावी भारतीय अमेरिकी व्यक्तींनीदेखील भारताला तातडीनं मदत देण्याची मागणी बायडन प्रशासनाकडे केली आहे.

तुम्ही तुमचं बघून घ्या! अमेरिकेनं भारताला दाखवला ठेंगा; कोरोना संकटात अडचणी वाढल्या

अमेरिकेनं कोरोना लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन कच्च्या मालाची निर्यात करण्यात यावी. कठीण काळात भारतासारख्या देशांना मदत केली जावी, अशी भूमिका यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सनं केली आहे. अमेरिकेत ऍस्ट्राझेनेका लसींचा मोठा साठा आहे. या साठ्यातील लाखो लसी भारत, ब्राझीलसारख्या देशांना पाठवण्यात याव्या. अन्य जीवनरक्षक औषधंदेखील या राष्ट्रांना दिली जावीत, असं आवाहन यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सनं सरकारला केलं आहे.

अमेरिकेकडे लसींचा पुरेसा साठा
अमेरिकेकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा आहे. देशातील लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचं उत्पादन जूनपर्यंत स्थानिक उत्पादक करतील. त्यामुळे सध्या असलेल्या साठ्याची अमेरिकेला तितकीशी गरज नाही, असं यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे प्रमुख मायरॉन ब्रिलियंट यांनी म्हटलं आहे. अमेरिकन सरकारनं भारतासारख्या गरजू देशांना मदत करावी. त्यामुळे त्यांच्यासोबतचे आपले संबंध आणखी घट्ट होतील, असंदेखील ते म्हणाले.

Web Title: CoronaVirus News pressure mounts on joe biden to ship astrazeneca vaccine other medical supplies to india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.