CoronaVirus News: कोरोनाग्रस्त रुग्णांवर हे औषध ठरतंय 'रामबाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:34 AM2020-05-01T03:34:38+5:302020-05-01T06:37:43+5:30
या औषधानं रुग्णांच्या प्रकृतीत खूप चांगला फरक पडल्याचे दिसून आले.
वॉशिंग्टन : कोरोना साथीची लागण झालेल्या रुग्णांवरील उपचारांत रेमडेसिव्हिर हे विषाणू प्रतिबंधक औषध अत्यंत उपयोगी ठरणार असल्याची चिन्हे त्यासंदर्भातील प्रयोगांतून दिसून आली आहेत. यासंदर्भात संसर्गजन्य रोग या विषयातील अमेरिकी तज्ज्ञ अँथनी फौसी यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांपैकी काही जणांना रेमडेसिव्हिर हे औषध पाच दिवस, तर काही जणांना दहा दिवस देण्यात आले.
या रुग्णांच्या प्रकृतीत खूप चांगला फरक पडल्याचे दिसून आले. रुग्ण बरे होण्यात रेमडेसिव्हिर हे औषधही गुणकारी ठरले. पाच दिवस रेमडेसिव्हिर औषध घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत जितकी सुधारणा झाली होती, तेवढेच प्रमाण हे औषध १० दिवस घेणाºया रुग्णांमध्येही आढळून आले होते. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथील गिलिड सायन्सेस ही कंपनी कोरोना रुग्णांवर रेमडेसिव्हिर औषधाच्या चाचण्या करत आहे. रेमडेसिव्हिर हे औषध घेतल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत किती सुधारणा झाली त्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यावरून हे औषध कोरोनावर किती गुणकारी आहे हे ठरविण्यात येत आहे. हे औषध घेण्यास सुरुवात केल्यानंतर रुग्णाच्या श्वसनक्रियेत सुधारणा झाली. तर काही लोक पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
>अमेरिकेत सुरू असलेल्या प्रयोगातील निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोनाची संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत जर रेमडेसिव्हिर हे औषध दिले तर त्याचा परिणाम त्यानंतरच्या दहा दिवसांत दिलेल्या औषधाच्या परिणामांपेक्षा अधिक उत्तम असतो. ज्यांना रेमडेसिव्हिर हे औषध पाच दिवसांसाठी दिले, त्यांच्यापैकी ५० टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तशीच सुधारणा ज्यांना १० दिवस हे औषध दिले त्यांच्यातही दिसून आली. या दोन्ही गटांतील रुग्णांपैकी निम्मे रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.