CoronaVirus News: मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार; श्वासाच्या आधारे झटक्यात निदान होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:30 PM2021-05-24T13:30:38+5:302021-05-24T13:31:06+5:30

CoronaVirus News: श्वासाच्या आधारे कोरोना चाचणी होणार; एका मिनिटात निष्कर्ष समजणार

CoronaVirus News Singapore provisionally approves 60 second COVID 19 breathalyser test | CoronaVirus News: मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार; श्वासाच्या आधारे झटक्यात निदान होणार

CoronaVirus News: मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार; श्वासाच्या आधारे झटक्यात निदान होणार

Next

सिंगापूर: कोरोना चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यासाठी लागणारा वेळ अनेकदा प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतो. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना अहवाल मिळवण्यासाठी काही तासांचा कालावधी लागतो. काही ठिकाणी तर अहवाल प्राप्त होण्यास एक ते दोन दिवस लागतात. सिंगापूरमधील एका स्टार्ट अपनं यावर एक उपाय शोधून काढला आहे. सिंगापूरमधील प्राधिकरणानं कोविड-१९ ब्रेदलायझरच्या चाचणीला परवानगी दिली आहे.

मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणार

एखाद्या व्यकीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची माहिती अवघ्या एका मिनिटात ब्रेदलायझरच्या माध्यमातून मिळू शकते. सिंगापूरमधील ब्रेदॉनिक्स या स्टार्ट अपनं ब्रेदलायझरची निर्मिती केली आहे. सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातील ब्रेदॉनिक्स सध्या आरोग्य मंत्रालयासोबत काम करत असून ब्रेदलायझर तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरू आहेत. यासाठी मलेशियाला लागून असलेल्या एका भागाची निवड करण्यात आली आहे. सध्या सिंगापूरमध्ये अँटिजन टेस्ट करण्यात येतात. त्यासोबतच आता ब्रेदलायझरच्या चाचणीलादेखील सुरुवात होईल.

जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघड

ब्रेदलायझरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ९० टक्के चाचण्या अचूक ठरल्याचा दावा ब्रेदॉनिक्स कंपनीनं केला. देशातील प्राधिकरणानं ब्रेदलायझरच्या चाचणीला परवानगी दिल्याची माहिती आरोग्य विज्ञान प्राधिकरणाच्या संकेतस्थळानं दिली. ब्रेदलायझरच्या माध्यमातून चाचणी करताना प्रत्येकवेळी वेगळ्या माऊथपीसचा वापर केला जातो. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका नाही. चाचणी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं ब्रेदलायझरमध्ये श्वास सोडल्यानंतर त्यातील केमिकल कंपाऊंड्सचं विश्लेषण केलं जातं. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही, याचा निष्कर्ष काढला जातो. चाचणीत एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळ्यास त्यानंतर तिची पीसीआर चाचणी केली जाते, अशी माहिती कंपनीनं दिली.

Web Title: CoronaVirus News Singapore provisionally approves 60 second COVID 19 breathalyser test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.