CoronaVirus News: संक्रमितांमधील नवी लक्षणे आली समोर, संसर्ग झाल्यास तीन दिवसांनंतर नष्ट होते 'ही' क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 06:59 PM2020-05-09T18:59:15+5:302020-05-09T19:15:10+5:30

हे लक्षण समजणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. यामुळे संबंधित व्यक्ती संक्रमाणाच्या पहिल्याच आठवड्यात आहे, हे कळू शकते. तसेच, पुढील एक अथवा दोन आठवडे त्याच्या उपचारासाठी मिळू शकतात.

CoronaVirus News some new symptoms are detected in the corona infected patients | CoronaVirus News: संक्रमितांमधील नवी लक्षणे आली समोर, संसर्ग झाल्यास तीन दिवसांनंतर नष्ट होते 'ही' क्षमता

CoronaVirus News: संक्रमितांमधील नवी लक्षणे आली समोर, संसर्ग झाल्यास तीन दिवसांनंतर नष्ट होते 'ही' क्षमता

Next
ठळक मुद्देस्वीत्झर्लंडमधील कॅन्टोंसपिट ऑरो रुग्णालयात कोरोनाच्या 103 रुग्णांवर सहा आठवडे अभ्यास केल्यानंतर, ही बाब समोर आली आहेसीडीसीने ही लक्षणे आपल्या अधिकृत यादीतही समाविष्ट केली आहेतएखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होण्याचा इतर लक्षणांशीही थेट संबंध

न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसची नव-नवीन लक्षणे सातत्याने समोर येत आहेत. सिनसिनाटी युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार, कोरोनाचा संसर्ग झाला, की तीन दिवसांनंतर रुग्णांची एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षणता नष्ट होते. एवढेच नाही, तर अनेक रुग्णांच्या स्वाद ओळखण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या संशोधनात तरूण आणि महिला रुग्णांमध्ये ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसून आली.

स्वीत्झर्लंडमधील कॅन्टोंसपिट ऑरो रुग्णालयात कोरोनाच्या 103 रुग्णांवर सहा आठवडे अभ्यास केल्यानंतर, ही बाब समोर आली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना विचारण्यात आले, की त्यांच्यात किती दिवसांपासून लक्षणे आहेत? तसेच, लक्षणांचे टायमिंग आणि गंभीरता यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. 

आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

यापूर्वी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननेही (सीडीसी) कोरोनामुळे चव आणि एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते, असे म्हटले होते. सीडीसीने ही लक्षणे आपल्या अधिकृत यादीतही समाविष्ट केली आहेत. 

एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होण्याचा इतर लक्षणांशीही थेट संबंध -
सिनसिनाटी युनिव्हर्सिटीच्या यूसी कॉलेज ऑफ मेडिसिन डिपार्टमेंटच्या ऑटोलरीन्गोलॉजी सर्जरीचे असोसिएट प्रोफेसर अहमद सेदाघाट यांच्या मते, कोरोना संसर्गामुळे अॅनोस्मिया (एखाद्या गोष्टीचा वास घेण्याच्या क्षमतेत कमी) होने अत्यंत घातक आहे. याचा संबंध थेट रुग्णांमध्ये समोर येणाऱ्या इतर लक्षणांशी आहे. एस्नोमियाची  लक्षणे अधिक असतील तर रुग्णांत खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि तापेचे प्रमाणही अधिक असेल.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

नव्या लक्षणांची माहिती होणे कोरोनावरील उपचारासाठी महत्वाचे -
सेदाघाट यांच्या मते, या संशोधनात जवळपास 61 टक्के रुग्णांनी वास घेण्याची क्षमता नष्ट झाल्याचे मान्य केले. यांच्यातील ही क्षमता नष्ट होण्याचा कालावधी 3 दिवस 4 तास, एवढा असल्याचे समोर आले आहे. संशोधकांच्या मते हे लक्षण समजणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीत कोरोना संसर्गासोबतच वास घेण्याची क्षमता कमी असेल, तर हे कळू शकते, की संबंधित व्यक्ती संक्रमाणाच्या पहिल्याच आठवड्यात आहे. यामुळे, पुढील एक अथवा दोन आठवडे त्याच्या उपचारासाठी मिळू शकतात. मात्र, हा केवळ आजाराचा एक संकेत आहे, याला पूर्ण कारण मानले जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा - 'औरंगजेबा'ने बनवले होते मुस्लीम, तब्बल 40 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात केला प्रवेश

Web Title: CoronaVirus News some new symptoms are detected in the corona infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.