CoronaVirus News: रशियात मानवी लसीची चाचणी यशस्वी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:26 PM2020-07-21T23:26:59+5:302020-07-21T23:27:09+5:30
उद्योगपती, राजकारणी लोकांना लस दिली?
Next
मॉस्को : वैज्ञानिकांच्या एका चमूने दावा केला आहे की, रशियाने कोरोना लसीची मानवी चाचणी पूर्ण केली आहे. रशियातील अनेक उद्योगपती आणि बड्या राजकारणी मंडळींना एप्रिल महिन्यातच कोरोनाविरोधातील प्रायोगिक लस देण्यात आली आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, ज्यांना ही लस देण्यात आली त्यात अॅल्युमिनिअम जायंट कंपनी युनायटेड रसेलचे वरिष्ठ अधिकारी, अब्जाधीश आणि सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ही लस मॉस्को येथील गमलेया या सरकारी इन्स्टिट्यूटने एप्रिल महिन्यातच तयार केली आहे, असे काहींनी सांगितले. या लसीची पहिली चाचणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे. ही चाचणी रशियन सैनिकांवर करण्यात आली होती.