CoronaVirus News : रशियात कोरोनावरील लसीची यशस्वी चाचणी, सेनेचोव्ह विद्यापीठाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:45 AM2020-07-13T02:45:04+5:302020-07-13T06:26:16+5:30
या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा सत्य खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
मॉस्को : कोरोना लस तयार करण्यात अखेर रशियाने बाजी मारल्याचे दिसते. रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील लस तयार केली असल्याचा दावा केला आहे. या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा सत्य खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने १८ जूनलाच रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट आॅफ अ?ॅपिडोमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीच्या परीक्षणाला सुरूवात केली होती. सेचेनोव्ह विद्यापीठाने या लसीचे स्वयंसेवकांवरील परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
लवकरच बाजारात येणार लस
इन्सिट्यूट आॅफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड
वेक्टर बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांच्या मते, या संशोधनाचा हेतू, मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोरोनावरील लस तयार करणे हा होता.
सुरक्षिततेच्या दृष्टाने या लसीच्या सर्व बाबींची तपासणी केली आहे. लोकांच्या उपयोगासाठी लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होईल. तारसोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन केंद्र म्हणून म्हणूनही कौतुकास्पद काम केले
आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेच्या मॉडनार्नेचीही घोषणा
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसवरील लसीचे संशोधन तसेच परीक्षणे सुरु असतानाच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडनार्नेही आपल्या लसीचे अखेरचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. 30 हजार जणांवर ही लस देण्याची कंपनीची योजना आहे.