CoronaVirus News : अवघ्या 16 सेकंदासाठी 'त्याने' मास्क काढला अन् तब्बल 2 लाख दंड ठोठावला; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:58 PM2022-02-01T16:58:01+5:302022-02-01T17:10:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: मास्क न लावणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. अवघ्या 16 सेकंदासाठी तरुणाने मास्क काढला अन् त्याला तब्बल 2 लाख दंड भरावा लागल्याची घटना घडली आहे.

CoronaVirus News uk man hit with rs 2 lakh fine for taking his mask off in shop | CoronaVirus News : अवघ्या 16 सेकंदासाठी 'त्याने' मास्क काढला अन् तब्बल 2 लाख दंड ठोठावला; झालं असं काही...

CoronaVirus News : अवघ्या 16 सेकंदासाठी 'त्याने' मास्क काढला अन् तब्बल 2 लाख दंड ठोठावला; झालं असं काही...

Next

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 37 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मास्क न लावणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. अवघ्या 16 सेकंदासाठी तरुणाने मास्क काढला अन् त्याला तब्बल 2 लाख दंड भरावा लागल्याची घटना घडली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मास्कबाबत हा दावा केला आहे. 

एका दुकानात फक्त 16 सेकंदासाठी मास्क काढला, ज्यासाठी तब्बल 2,000 पाऊंड (2 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आल्याचं तरुणाने म्हटलं आहे. क्रिस्टोफर ओ'टूल असं या तरुणाचं नाव असून त्याने इंग्लंडमधील प्रेस्कॉट येथील बी अँड एम स्टोअरमध्ये खरेदी करताना मास्क लावला होता. परंतु अस्वस्थ वाटल्यानंतर काही सेकंदांसाठी तो काढून टाकला. याच दरम्यान, स्टोअरमध्ये उपस्थित असलेला एक पोलीस अधिकारी त्याच्याकडे गेला आणि त्याने मास्क न घातल्याचे नाव लिहून घेतलं.

(फोटो - TimesNow)

रिपोर्टनुसार, ही घटना फेब्रुवारी 2021 मध्ये घडली आहे, जेव्हा यूकेमधील सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य होते. 'लिव्हरपूल इको'शी बोलताना क्रिस्टोफरने सांगितलं की, त्याला मास्क घालण्याच्या नियमात कोणतीही अडचण नाही. पण त्याने काही सेकंदांसाठी मास्क काढला, तोही तब्येत बरी नसताना. काही दिवसांनंतर क्रिस्टोफरला ACRO क्रिमिनल रेकॉर्ड ऑफिसकडून एक पत्र मिळाल्यावर त्याला धक्का बसला. कारण त्याला £100 दंड भरण्याचे आदेश दिले होते. परंतु जेव्हा क्रिस्टोफरने अधिकार्‍यांना ई-मेलवर स्पष्टीकरण देऊन दंड भरण्यास नकार दिला तेव्हा त्याला दुसरे पत्र मिळाले ज्याने दंड वाढवून £2,000 केला.

क्रिस्टोफर म्हणाला, मी ईमेल केला की 16 सेकंदांसाठी मास्क काढल्याबद्दल मी दंड भरणार नाही. त्यानंतर अनेक महिने याबाबत माहिती मिळाली नाही. पण डिसेंबरच्या सुरुवातीला पत्र आल्यावर मला धक्काच बसला. मला £2,000 दंड भरायचा आहे असं त्यात म्हटलं आहे. जेव्हा मी त्यांना परत ईमेल केला तेव्हा त्याच्या नकळत हे प्रकरण कोर्टात पोहोचल्याचे कळलं. आपल्याला याबद्दल काहीही माहीत नाही हे दाखवण्यासाठी त्याला एका घोषणेवर स्वाक्षरी करावी लागली. मात्र, कायदेशीर लढाई अद्याप संपलेली नाही. याप्रकरणी तो लवकरच न्यायालयात हजर होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: CoronaVirus News uk man hit with rs 2 lakh fine for taking his mask off in shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.