CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:21 AM2020-05-20T11:21:32+5:302020-05-20T11:34:49+5:30

जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे. 

CoronaVirus News : world bank says 60 million people will be trapped in quagmire of poverty vrd | CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. 15 महिन्यांत 160 अब्ज डॉलर्स दिले जातील. जागतिक बँक मदत करत असलेल्या या 100 देशांमध्ये जगातील 70 टक्के लोकसंख्या आहे.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे. 

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपॉस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "हा साथीचा रोग संपेपर्यंत 60 दशलक्षाहूनही अधिक लोक गरिबीच्या दलदलीत अडकतील." दारिद्र्य निर्मूलनासाठी अलिकडच्या काळात आपण बरीच प्रगती केलेली असून, ती नष्ट होणार आहे.  ते म्हणाले, "वर्ल्ड बँक समूहाने वेगवान पावले उचलली आहेत आणि 100 देशांमध्ये आपत्कालीन मदत कार्ये सुरू केली आहेत. यामध्ये इतर देणगीदारांना या कार्यक्रमासह पुढे जाण्याची परवानगी आहे. ”ते म्हणाले की, 15 महिन्यांत 160 अब्ज डॉलर्स दिले जातील. जागतिक बँक मदत करत असलेल्या या 100 देशांमध्ये जगातील 70 टक्के लोकसंख्या आहे. त्यापैकी 39 आफ्रिकेतील उप-सहारा भागातील आहेत.

या मदतीच्या परियोजनेत एक तृतीयांश अफगाणिस्तान, चाड, हैती आणि नायजर यांसारख्या प्रभावित भागांचा समावेश आहे. मालपॉस म्हणाले, "विकासाच्या मार्गाकडे परत जाण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपली नजर जलद आणि भेदक असायला हवी. त्याचबरोबर गरिबांना मदत करण्यासाठी रोख रक्कम व इतर मदत, खासगी क्षेत्र कायम ठेवले पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचे मजबुतीकरण व पुनरुज्जीवन केले पाहिजे. ते म्हणाले की, हा कार्यक्रम देशांच्या अनुषंगाने तयार करण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना सामोरे जाणा-या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा प्रभावीपणे सामना करता येईल. मालपॉस म्हणाले की, या कार्यक्रमामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होईल आणि जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात मदत होईल.

हेही वाचा

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

Web Title: CoronaVirus News : world bank says 60 million people will be trapped in quagmire of poverty vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.