CoronaVirus: आता मास्क लावायची गरज नाही! इस्रायलनंतर आणखी एका बड्या देशाची नागरिकांना 'साद'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 10:06 AM2021-04-28T10:06:16+5:302021-04-28T10:07:16+5:30

CDC says many Americans can now go outside without a mask: कोरोनाच्या लाटेत अमेरिकनांनीही अनेक आप्तस्वकियांना गमावले आहे. आता पुन्हा अमेरिका पूर्वीसारखे जीवन जगण्याच्या मार्गावर आहे. 

CoronaVirus: No need to wear a mask for vaccinated people in America; CDC, joe biden announcement | CoronaVirus: आता मास्क लावायची गरज नाही! इस्रायलनंतर आणखी एका बड्या देशाची नागरिकांना 'साद'

CoronaVirus: आता मास्क लावायची गरज नाही! इस्रायलनंतर आणखी एका बड्या देशाची नागरिकांना 'साद'

googlenewsNext

कोरोना संकटाच्या सुरुवातीला खूप वाईट दिवस पाहिलेली अमेरिका (America) आता कोरोनावर (Corona Virus) विजय प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकेत ज्या लोकांनी पूर्णपणे कोरोना लस घेतली आहे, त्यांनी मोठी गर्दीची ठिकाणे सोडून अन्य ठिकाणी फिरताना मास्क लावण्याची गरज नाही, असे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमेरिकनांनीही अनेक आप्तस्वकियांना गमावले आहे. आता पुन्हा अमेरिका पूर्वीसारखे जीवन जगण्याच्या मार्गावर आहे. (U.S. health officials say fully vaccinated Americans don't need to wear masks outdoors anymore unless they are in a big crowd of strangers.)


अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून अन्यत्र कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी देखील ट्विट करत सीडीसीच्या या सूचनेवर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोना विरोधातील लढाईमध्ये आम्ही जी असामान्य प्रगती केली आहे, त्यामुळेच सीडीसीने आज मोठी घोषणा केली आहे, असे ते म्हणाले. 


बायडेन यांनी पुढे म्हटले की, जर तुम्ही कोरोना लसीकरण पूर्ण केले असेल तर तुम्हाला गर्दी सोडून अन्य ठिकाणी मास्क लावून फिरण्याची गरज राहिलेली नाही. लसीकरण तुमच्या आजुबाजुच्या लोकांना वाचविण्यासाठी गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे आयुष्य सामान्य पद्धतीने पुन्हा जगण्यासाठी हे आहे. याचा अर्थ असा नाही की जा आणि गोळी मारा, हे एवढे सोपे नाहीय, असे बायडेन म्हणाले.

अमेरिकेत सध्या निम्म्याहून अधिक लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर एकूण लोकसंख्येचा एक तृतियांश लोकांना दुसरा डोसही मिळाला आहे. 


इस्त्रायल बनला पहिला देश
चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे. कोरोना व्हायरस 2019च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून पसरला. कोरनाचे स्क्रमण एवढ्या वेगाने परसले, की त्यांने अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांना यामुळे जीव गमवावा लागला. इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: CoronaVirus: No need to wear a mask for vaccinated people in America; CDC, joe biden announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.