coronavirus : नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाचा दावा, एड्सवरील उपाय शोधण्याचा परिणाम आहे कोरोना व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:33 AM2020-04-19T11:33:57+5:302020-04-19T11:37:09+5:30

अशात आता नोबेल पारितोषिक मिळालेले फ्रान्समधील प्राध्यापक लुक मोन्टाग्लिअर यांनी एक वेगळाच दावा केला आहे.

coronavirus : Nobel Prize winner Dr Luc Montagnier Says Covid-19 was “manipulated” for HIV Research api | coronavirus : नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाचा दावा, एड्सवरील उपाय शोधण्याचा परिणाम आहे कोरोना व्हायरस

coronavirus : नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाचा दावा, एड्सवरील उपाय शोधण्याचा परिणाम आहे कोरोना व्हायरस

googlenewsNext

कोरोना व्हायरस चीनमधील लॅबमधून जगभरात पसरला असा कथित दावा वेगवेगळे लोक करत आहेत. तर काही रिसर्चमधून कोरोना व्हायरस हा वटवाघूळ आणि खवल्या मांजरातून मनुष्यात आला.

पण अजूनही ठामपणे याबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही. चीनने त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळले आहेत. अशात आता नोबेल पारितोषिक मिळालेले फ्रान्समधील प्राध्यापक लुक मोन्टाग्लिअर यांनी एक वेगळाच दावा केला आहे.

timesofindia.indiatimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, प्राध्यापक लुक मोन्टाग्लिअर यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'कोरोना व्हायरस एड्सवरील उपचार करण्यासाठी वॅक्सीन विकसित करण्याच्या प्रयत्नाचा परिणाम आहे. या व्हायरसच्या जीनोमध्ये असलेल्या एचआयव्ही आणि मलेरियाच्या कीटाणूंचं असणं त्याकडे इशारा करतं. कोरोना व्हायरस नैसर्गिक रूपाने तयार झालेला असू शकत नाही'.

ते म्हणाले की, 'ही व्यावसायिक दुर्घटना वुहानमधील नॅशनल बायोसेफ्टी लॅबमध्ये झाली. त्यांनी असा दावा केला की, वुहान सिटी लॅबमध्ये अशाप्रकारे कोरोना व्हायरसवर 2000 पासून म्हणजे 20 वर्षाआधीपासून रिसर्च होत आहे. ते या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी व्हायरसला नष्ट करण्यासाठी तरंगांची थेअरी वापरण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

या थेअरीबाबत काही दिवसांपूर्वी भरपूर खिल्लीही उडवली गेली होती. तर पॅरिसमधील एक वायरॉलॉजिस्ट इटियन सायमन यांनी दावा केलाय की, लुक यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही. असे जेनेटिक सीक्वेंस दुसऱ्या कोरोना व्हायरसमध्येही आढळतात.  

ते म्हणाले की, 'जर आपण एखाद्या पुस्तकातील शब्द घेतला आणि तो शब्द दुसऱ्या पुस्तकातही असला तर याचा अर्थ हा नाही होत की, पूर्ण पुस्तक कॉपी करण्यात आलंय. तसंच या घटनेबाबत आहे. तर कोरोना व्हायरस हे निसर्ग आपोआप नष्ट करू शकत नाही'.


Web Title: coronavirus : Nobel Prize winner Dr Luc Montagnier Says Covid-19 was “manipulated” for HIV Research api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.