coronavirus : उत्तर कोरियाचे बिंग फुटले, किम जोंग गुपचूप करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:30 AM2020-03-31T09:30:19+5:302020-03-31T09:35:04+5:30

किम जोंग उनने हुकूमशाहीच्या पोलादी पडद्याखाली लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे.

coronavirus: North Korea secretly work for hide corona Patient BKP | coronavirus : उत्तर कोरियाचे बिंग फुटले, किम जोंग गुपचूप करतोय हे काम

coronavirus : उत्तर कोरियाचे बिंग फुटले, किम जोंग गुपचूप करतोय हे काम

googlenewsNext
ठळक मुद्देकिम जोंग उनने हुकूमशाहीच्या पोलादी पडद्याखाली लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. उत्तर कोरियात आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. त्यामुळे येथे कोरोना भयावह रूप घेण्याची शक्यता आहे.

- संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना चीनच्या सीमेला अगदी लागून असलेल्या उत्तर कोरियाने मात्र आपल्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला होता. मात्र उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पण किम जोंग उनने हुकूमशाहीच्या पोलादी पडद्याखाली लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे. 

नुकत्याच सामोर आलेल्या गोपनीय अहवालानुसार उत्तर कोरियाकडून देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला असला तरी पडद्यामागे मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी उत्तर कोरियाचे सरकार गोपनीयपणे इतर देशांकडे मदत मागत आहे. 'द फायनान्शिअल टाइम्स'ने दिलेल्या वृतानुसार उत्तर कोरियाचे अधिकारी गुप्तपणे इतर देशांच्या समकक्षांशी चर्चा करत आहेत. तसेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडे मास्क आणि टेस्ट मशीन पाठवण्याची विनंती   केल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले होते. 

दरम्यान, उत्तर कोरियाने जानेवारी महिन्याच्या अखेरीस चीनला लागून असलेली आपली सीमा बंद केली होती. तसेच चीनमधून आलेल्या आपल्या देशाच्या 590 नागरिकांची तपासणी केली होती. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. 

दुसरीकडे उत्तर कोरियात कोरोनामुळे अनेकजणांचा मृत्यू झाला असून, ही बाब ते जगापासून लपवत असल्याचा दावा दक्षिण कोरियातील अनेक प्रसारमाध्यमांनी केला होता. जानेवारी आणि फेब्रुवारीदरम्यान उत्तर कोरियात कोरोनामुळे 180 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे तसेच 3700 सैनिकांचे विलगिकरण करण्यात आल्याचे उत्तर कोरियावर प्राधान्याने बातम्या देणाऱ्या डेली एनकेने म्हटले आहे. तसेच उत्तर कोरियाच्या चीनला लागून असलेल्या सिनुइयू प्रांतात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डेली एनकेने म्हटले आहे. 

उत्तर कोरियात आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. त्यामुळे येथे कोरोना भयावह रूप घेण्याची शक्यता आहे.

Web Title: coronavirus: North Korea secretly work for hide corona Patient BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.