CoronaVirus : Omicronची दहशत! 'या' देशात लागला 'क्रूर लॉकडाउन'! प्रेग्नेंट महिला-मुलही मेटल बॉक्समध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 06:29 PM2022-01-12T18:29:46+5:302022-01-12T18:31:09+5:30
या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. या मेटल बॉक्समध्ये त्यांच्याकडे फारच कमी अन्न असायचे. त्यांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. येथे बसेस भरून लोक आणले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची परिस्थिती बिघडवली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनच्या (China) अनयांगसह अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दोन कोटींहून अधिक लोक कडक लॉकडाऊन नियमांत आहेत. चीनच्या 'झिरो कोविड पॉलिसी'अंतर्गत प्रचंड सतर्कता बाळगली जात आहे. या धोरणांतर्गत चीनने आपल्या लोकांवर अतिशय कडक निर्बंध लादले आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, चीनने मोठ्या प्रमाणावर क्वारंटाइन कॅम्पचे नेटवर्क तयार केले आहे. तेथे हजारो मेटल बॉक्स तयार करण्यात आले आहेत. यात प्रेग्नंट महिला, लहान मुलांसह अनेकांना आयसोलेट केले जाते. (Worlds strictest lockdown in China)
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात वुहान आणि हुबेई प्रांताच्या इतर भागांना बंद केल्यानंतर, आतापर्यंतचा हा सर्वात कडक लॉकडाऊन आहे. सध्या, Shiyan मधील सुमारे 125 कोटी लोक आणि Yuzhou मधील 10 लाखहून अधिक लोक लॉकडाऊन अंतर्गत कैद आहेत. तर अनयांग शहरात 55 लाख लोक घरांमध्ये बंद आहेत.
चीनमध्ये 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचे वर्णन 'जगातील सर्वात कडक लॉकडाऊन', असे केले जात आहे. यात जनतेवर अत्यंत क्रूर निर्बंध लादण्यात आले आहेत.
लोकांना मेटलच्या बॉक्समध्ये ठेवले जाते...!
संबंधित वृत्तानुसार, कोरोनाच्या भीतीमुळे लोकांना दोन आठवडे एका छोट्या मेटलच्या बॉक्ससारख्या असलेल्या खोलीत ठेवले जाते. सुविधांच्या नावाखाली तेथे केवळ बेड आणि शौचालयच देण्यात आले आहे. चिनी माध्यमांनी स्वतःच याचे फोटो प्रसिद्ध केले होते. यात Shijiazhuang प्रांतातील 108 एकरच्या क्वारंटाईन कॅम्पसमध्ये हजारो लोकांना कसे ठेवले आहे हे दाखवले आहे. हे कॅम्पस पहिल्यांदा जानेवारी 2021 मध्ये तयार करण्यात आले होते.
या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. या मेटल बॉक्समध्ये त्यांच्याकडे फारच कमी अन्न असायचे. त्यांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. येथे बसेस भरून लोक आणले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितले की, 'येथे काहीही नाही, केवळ मूलभूत गोष्टी आहेत... आम्हाला तपासण्यासाठी कुणीही आले नाही, हे कसले क्वारंटाइन सेंटर आहे? वृद्ध आणि लहान मुलांनाही येथे ठेवण्यात आले आहे. बाहेर निघाल्यानंतर मारले जाते.