Coronavirus Outbreak! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 05:30 AM2022-12-25T05:30:30+5:302022-12-25T05:31:04+5:30

चीनमध्ये कोरोनाचा स्फोट होण्याला चीनमधील बोगस लस कारणीभूत असल्याचे समजते.

coronavirus outbreak in china 3 7 crore new patients in 24 hours | Coronavirus Outbreak! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन

Coronavirus Outbreak! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन

googlenewsNext

बीजिंग:चीनमध्ये काेराेनामुळे हाहाकार उडाला आहे. रुग्णसंख्या वाढीसाेबत मृत्यूचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की, मृदतेह ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. चिता शांत हाेण्यापूर्वीच अनेक मृतदेह आणले जात आहेत. एवढेच नव्हे तर अस्थी मिळविण्यासाठी नातेवाइकांना टाेकन घ्यावे लागत आहेत. ब्लूमबर्गने चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या हवाल्याने सांगितले की, मंगळवारी देशात एका दिवसात ३ कोटी ७० लाख नवे काेराेनाबाधित आढळले आहेत. 

या महिन्यात २० दिवसांत २४ कोटी ८० लाख लोकांना संसर्ग झाला. जानेवारीत एका दिवसात ४० लाख लोकांना संसर्ग झाला होता. ख्रिसमसच्या काळात घरात थांबण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्यामुळे ब्लड बँकेत रक्ताची कमतरता दिसून येत आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. मेडिकल स्टाफलाही संसर्ग झाला तरीही काही डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत.

लपवालपवीबाबत मौन

सरकारी आकडेवारीनुसार, एका दिवसात केवळ तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. चीनच्या शेनडोंग राज्यात किंगडाओ शहरात एका दिवसात पाच लाख रुग्ण आढळले आहेत. या शहराची लोकसंख्या ५८ लाख आहे. अर्थात, चीन सरकारने या शहरात केवळ ३१ रुग्ण आढळल्याचे सांगितले आहे.  (वृत्तसंस्था)

कोणत्या देशात किती रुग्ण 

जपानमध्ये २४ तासांत १.७३ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. जपानमधील ही आठवी लाट आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मुलांचा मृत्यू होत आहे. फ्रान्स आणि दक्षिण कोरियात अनुक्रमे ४३ हजार आणि ६८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. फ्रान्समध्ये १५८ आणि द. कोरियात ६३ मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत एक्सबीबी व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. हासुद्धा ओमायक्रॉनचा प्रकार आहे.  

योगा, जलनेतिचा आधार, भारतीय औषधांना मागणी

बचावासाठी चीनमधील लोक योगा आणि जलनेति करताना दिसत आहेत. जलनेतिमुळे श्वासाशी संबंधित विकार, जुनी सर्दी, दमा यावर आराम मिळतो. भारतातील कंपन्या चीनला औषध पुरवठा करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. भारतीय जेनरिक औषधी ब्रँडेड औषधींच्या तुलनेत चारपट स्वस्त आहेत. 

चीनची लसही ठरली कुचकामी 

चीनमध्ये कोरोनाचा स्फोट होण्याला चीनमधील बोगस लस कारणीभूत असल्याचे समजते. भारतासारख्या देशात लसीमुळे प्रतिकारशक्ती तयार झाली. मात्र, चीनमध्ये याउलट परिस्थिती आहे. चीनमधील लसीचा सकारात्मक परिणाम न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले जात आहे. 

९१ देशांत पसरला धोकादायक व्हेरियंट

बीएफ.७ व्हेरियंट चीनमधील बीएफ.७ व्हेरियंट भारतासह ९१ देशांत पसरला आहे. हा ओमायक्रॉनचा सर्वांत शक्तिशाली व्हेरियंट आहे. यावर अँटीबॉडीचा काहीही परिणाम होत नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: coronavirus outbreak in china 3 7 crore new patients in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.