CoronaVirus News : कोरोनाची लढाई जिंकले, 13 लाख लोक बरे होऊन घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:21 PM2020-05-08T15:21:24+5:302020-05-08T15:29:02+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,932,626 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,349,138 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 271,017 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 39 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,932,626 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,349,138 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. जवळपास 13 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर मात केली आहे. 1,349,138 लोक कोरोनातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन याच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावाhttps://t.co/1iY33Y2jFi#Coronavirus#CoronaUpdates#Eyes
— Lokmat (@MiLOKMAT) May 8, 2020
कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत असला तरी याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. अनेक लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील तब्बल 13 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच 13 लाखांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरकडे अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीदेशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 56 हजारांवर गेला आहे. 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावाhttps://t.co/o3UrqBiuv3#CoronaUpdatesInIndia#GujaratCoronaUpdate
— Lokmat (@MiLOKMAT) May 8, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा
CoronaVirus News : दारूमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, 'या' सरकारने सुरू केली 'ऑनलाईन टोकन' व्यवस्था
CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा