CoronaVirus News: कोरोनाचा मोठा फटका; अमेरिकेत बेरोजगारी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:38 AM2020-06-14T03:38:25+5:302020-06-14T03:39:38+5:30
बेरोजगारीचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धानंतर विक्रमी पातळीवर
वॉशिंग्टन : कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याने अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण दुसºया महायुद्धानंतर कधीही नव्हते एवढ्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अर्थव्यवस्थेसंबंधीचा काँग्रेससाठी तयार केलेला अहवाल प्रसिद्ध करताना एका व्हिडिओ पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोराना महामारी सुरू होण्याआधी अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ५० वर्षांत सर्वात कमी होते; परंतु एप्रिलमध्ये ते दुसºया महायुद्धानंतर होते त्या पातळीवर (१४.७ टक्के) पोहोचले. मे महिन्यातील १३.३ टक्के हे बेरोजगारीचे प्रमाणही चिंताजनकच राहिले. वास्तवात बेरोजगारी याहून तीन टक्क्यांपर्यंत अधिक असण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
त्यांनी असेही सांगितले की, सध्या ज्यांच्या नोकºया गेल्या आहेत त्यांत गरीब व निम्न मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. दीर्घकालीन उपायांनी अर्थव्यवस्थेस पुन्हा लवकर बळकटी आली नाही, तर यापैकी अनेकांवर कायमचे बेरोजगार होण्याची पाळी येऊ शकेल. (वृत्तसंस्था)