CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’च्या लशीची आजपासून चाचणी; ५०० स्वयंसेवक तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:46 AM2020-04-23T04:46:42+5:302020-04-23T04:47:22+5:30

ब्रिटन सरकारचे २० दशलक्ष पौंडांचे अनुदान

CoronaVirus Oxford Covid 19 vaccine trial on 500 humans from today | CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’च्या लशीची आजपासून चाचणी; ५०० स्वयंसेवक तयार

CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’च्या लशीची आजपासून चाचणी; ५०० स्वयंसेवक तयार

googlenewsNext

लंडन : सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना महामारीस आळा घालण्यास परिणामकारक ठरू शकेल अशी प्रतिबंधक लस आॅक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक तयार करत असून या लशीची मानवी चाचणी उद्या २३ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी सांगितले की, देशाच्या औषध नियामक प्राधिकरणाने या प्रायोगिक लशीच्या माणसांवर चाचण्या घेण्यास मंजुरी दिली असून कोणताही आजार नसलेले ५०० निरोगी स्वयंसेवक आपल्यावर या लशीची चाचणी करून घेण्यास तयार झाले आहेत. ही लस विकसित करण्यासाठी ब्रिटन सरकारने २० दशलक्ष पौंडाचे अनुदान दिले आहे. ही लस आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इस्टिट्यूटमध्ये विकसित केली जात आहे.

संशोधक चमूतील एक प्रा. अ‍ॅन्ड्र्ू पोलार्ड यांनी सांगितले की, कोणतीही अनपेक्षित अडचण न येता सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर या लशीच्या
लाखो डोसचे उत्पादन येत्या उन्हाळ्यापर्यंत (सप्टेंबर-आॅक्टोबर) करणे शक्य होईल. भारताच्या वैद्यकीय संशोधन परिषदेनेही या आॅक्सफर्ड लशीवर मोठा भरवसा व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)

औषध नियामक प्राधिकरणाची या प्रायोगिक लशीची माणसांवर चाचण्या घेण्यास मंजुरी
या लशीच्या लाखो डोसचे उत्पादन येत्या उन्हाळ्यापर्यंत (सप्टेंबर-आॅक्टोबर) करणे शक्य
कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न

Web Title: CoronaVirus Oxford Covid 19 vaccine trial on 500 humans from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.