Coronavirus: वेदनादायक! लॉकडाऊन परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार कसं करतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:13 PM2020-03-23T14:13:34+5:302020-03-23T14:18:34+5:30
वाऱ्याच्या वेगात पसरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग लोकांमध्ये होत आहे. खोकला, सर्दीसारखं सामान्य आजाराची लक्षण असल्यामुळे तातडीने कोरोना झाल्याचं दिसून येत नाही.
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशात शिरकाव केलेला आहे. आतापर्यंत जगभरात साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १४ हजारांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये असं आवाहन केले जात आहे.
वाऱ्याच्या वेगात पसरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग लोकांमध्ये होत आहे. खोकला, सर्दीसारखं सामान्य आजाराची लक्षण असल्यामुळे तातडीने कोरोना झाल्याचं दिसून येत नाही. सध्या सर्व देशात अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे. मात्र ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे दगावला आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करणंही नातेवाईकांना कठीण झालं आहे.
कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्या युरोपियन देश आयरलँडने अंत्यसंस्कारासाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार मृत व्यक्तीला हात लावणे, मिठी मारणे तसेच बॉडी बॅगशिवाय मृतदेह पाहणेही बंद केले आहे. एखाद्याच्या घरात मृत्यू झाल्यानंतर होणारी गर्दी रोखण्यात आली आहे. एकमेकांना आधार देणंही बंद केले आहे. चीननंतर इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणी मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला आहे. जवळपास ६० हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक जणांचा मृत्यू घरी अथवा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे. रुग्णालयात झालेल्या मृतदेहांवर रुग्णालय प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
शहरातील शवगृह २४ तास सुरु ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची वेस्टिंग लिस्ट तयार झाली आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी घराच्या नातेवाईकांना वाट पाहावी लागत आहे. या मृतदेहांना शहरापासून लांब जाळण्यात येते किंवा दफन केलं जातं. ८ मार्चपासून इटलीत लॉकडाऊन केले आहे. यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लोकांना एकत्र येऊ शकत नाही. एका इंग्रजी वाहिनीच्या वृत्तानुसार इटलीत मृतदेहांना आयसोलेशनपासून कब्रिस्तानला घेऊन जाण्यासाठी लष्कर पाचारण केले जाते. मृतदेहांच्या संपर्कात कोणी येऊ नये ही काळजी घेतली जाते. तर मृतांच्या नातेवाईकांना व्हिडीओच्या माध्यमातून अंत्यसंस्कार दाखवण्यात येतं.
महत्त्वाच्या बातम्या
ए भाऊ, हलक्यात नको घेऊ! कोरोनाग्रस्त महिलेचा आयसीयूतला व्हिडीओ व्हायरल
कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती
लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी रशियाने सोडले रस्त्यावर ८०० सिंह आणि वाघ? जाणून घ्या सत्य
स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन
लोक ऐकत नाहीत, आता 'हाच' एकमेव उपाय; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती