Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यास पाकचा नकार; इम्रान खान ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 05:36 PM2020-02-02T17:36:35+5:302020-02-02T17:38:56+5:30
चीनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 269हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्लाबामादः चीनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 269हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक दिवशी हा मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. भारतानंसुद्धा वुहानमध्ये अडकलेल्या 647 नागरिकांसाठी विशेष विमान पाठवून त्यांना परत आणलं. परंतु पाकिस्तानमधले हजारो विद्यार्थी वुहानमध्येच अडकून पडले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परत आणण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरून इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे.
चीनकडून त्या विद्यार्थ्यांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. पाकिस्तानातील त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी इम्रान खान यांच्यावर त्यांना परत आणण्यासाठी दबाव वाढवला आहे. परंतु सरकार त्यांचं ऐकण्यात तयार नाही. त्यांना तिकडून इथे आणणं हे जोखमीचं काम आहे, असा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे. एका पाकिस्तानी विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, आम्ही अनेक तास स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेत आहोत.
Pakistani student in Wuhan shows how Indian students are being evacuated by their govt. While Pakistanis are left there to die by the govt of Pakistan: pic.twitter.com/86LthXG593
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) February 1, 2020
पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले ट्रोल
पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अल्वी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिल्यानं ट्रोल झाले आहेत. डॉक्टर आरिफ अल्वी म्हणाले, जर हा रोग आणखी पसरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आहे तिकडेच राहिलं पाहिजे.
कोरोना वायरसच्या तपासणीसाठी एक नमुना पुरेसा: WHOAnother appeal by #Pakistani students in #Wuhan appeal to be evacuated...#CoronavirusOutbreak#coronavirus#WuhanOutbreak@ForeignOfficePk@MFA_China@CathayPak@pid_gov@ImranKhanPTI#NayaPakistanpic.twitter.com/QiYrZHokQP
— Geeta Mohan گیتا موہن गीता मोहन (@Geeta_Mohan) February 1, 2020
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाव्हायरसवर निर्देश जारी केले आहेत. त्याच्या तपासासाठी एक नमुना पर्याप्त असल्याचं WHOनं स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातल्या डॉक्टर प्रदीप आवटेंनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्हाला जागतिक आरोग्य संघटनेकडून काही निर्देश मिळालेले आहेत. त्यात कोरोनाव्हायरस संक्रमणाची तपासणी करण्यासाठी एक नमुना पुरेसा आहे. आम्ही आता तपासासाठी प्रत्येक रुग्णाचे दोन नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू-विज्ञा संस्थानात पाठवत आहोत.