CoronaVirus: “आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 03:14 PM2021-04-24T15:14:36+5:302021-04-24T15:16:59+5:30

CoronaVirus: पाकिस्तानातील एका संस्थेने पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

coronavirus pakistan edhi foundation letters to pm modi and offers 50 ambulance to india | CoronaVirus: “आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र

CoronaVirus: “आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र

Next
ठळक मुद्देपाकिस्तानातील एका संस्थेचे पंतप्रधान मोदींना पत्र५० रुग्णावाहिका पाठवण्याची तयारीआमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी - संस्था

इस्लामाबाद: गेल्या सलग तीन दिवसांपासून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम दिसून येत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. यातच, भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील एका संस्थेने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शवली असून, यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. (coronavirus pakistan edhi foundation letters to pm modi and offers 50 ambulance to india)

एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले असल्याची माहिती मिळाली आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. आताची परिस्थिती गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. 

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

तुमच्या नियोजनात आमची काही अडचण होणार नाही 

तुमच्या नियोजनात आमची अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णावाहिकांसोबत आम्ही स्वयंसेवकांची टीमही पाठवू. आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीच नकोय. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू, अशी ऑफर या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.  

न्या. एन. व्ही. रमणा नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी

आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, इतर अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफ असतील. आम्ही भारतातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. करोना आणि त्याचा भारतीय नागरिकांवर होणारा परिणाम याकडे आमचे सातत्याने लक्ष आहे. या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिका पाठवू इच्छितो. रुग्णावाहिकांसोबतच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानात जवळपास एका दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी व बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमध्ये एधी फाउंडेशनने केली होती. गीता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती.
 

Web Title: coronavirus pakistan edhi foundation letters to pm modi and offers 50 ambulance to india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.