CoronaVirus : पाकिस्तानचा दावा! लवकरच अशी लस तयार करणार, की एकाच डोसमध्ये कोरोना नष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:08 PM2021-04-14T21:08:55+5:302021-04-14T21:11:42+5:30

पाकिस्तानने या वर्षी तीन फेब्रुवारीलाच लसीकरण अभियानाला सुरुवात केली होती. चीनने 5 लाख डोस दिल्यानंतर पाकिस्ताने या अभियानाला सुरुवात केली होती. (CoronaVirus Pakistan)

CoronaVirus Pakistan to make single dose corona vaccine chinese team to help scientists | CoronaVirus : पाकिस्तानचा दावा! लवकरच अशी लस तयार करणार, की एकाच डोसमध्ये कोरोना नष्ट होणार

CoronaVirus : पाकिस्तानचा दावा! लवकरच अशी लस तयार करणार, की एकाच डोसमध्ये कोरोना नष्ट होणार

Next

इस्लामाबाद - कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी चीन आणि इतर देशांकडून मिळणाऱ्या लशींच्या मदतीने पाकिस्तानात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र आता, पाकिस्तानने एक मोठा दावा केला आहे. आम्ही लवकरच अशी लस तयार करू, जिचा केवळ एकच डोस घ्यावा लागेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. खरे तर, अशी लस तयार करण्यासाठी पाकिस्तानला चीनची एक टीम मदतही करत आहे. (CoronaVirus Pakistan to make single dose corona vaccine chinese team to help scientists)

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

पाकिस्तानच्या 'एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने नॅशनल असेंबलीच्या पॅनलला यासंदर्भात माहिती दिली आहे, की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) लवकरच पाकिस्ताची आपली कोरोना लस तयार करेल. जिचा केवळ एकच डोस घ्यावा लागेल. ही लस चीनची CansinoBio कोविड लसच असेल आणि पाकिस्तान याचे तंत्र चीनकडून घेईल. विशेष म्हणजे यासाठी पाकिस्तानने क्लिनिकल ट्रायलदेखील केले आहे.

NIHचे कार्यकारी संचालक मेजर जनरल आमिर इकराम यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानने चीनला लशीची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याची विनंती केली आहे. लशीसाठी लागणारा कच्चा माल याच महिन्यात पाकिस्तानला पोहोचेल. याशिवाय, चीनचा एक चमूही पाकिस्तानला पोहोचला आहे. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

'गावी'च्या सहाय्याने पाकिस्तानला मिळणार भारताने तयार केलेली लस - 
पाकिस्तानने या वर्षी तीन फेब्रुवारीलाच लसीकरण अभियानाला सुरुवात केली होती. चीनने 5 लाख डोस दिल्यानंतर पाकिस्ताने या अभियानाला सुरुवात केली होती. पाकिस्तानला ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्यूनायझेशन अर्थात 'गावी'च्या सहाय्याने भारताने तयार केलेली लसही मिळणार आहे. जूनपर्यंत लशीचे 1.6 कोटी डोस पाकिस्तानात पोहोचण्याची आशा आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

वर्ल्डोमीटरवर असलेल्या डेटानुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 7 लाख 34 हजार 423 रुग्ण समोर आले आहेत. तर एकूण 15 हजार 754 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. येथे टेस्टिंग कमी होत असल्यानेही कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी दिसत असल्याचे म्हटले जाते.

Web Title: CoronaVirus Pakistan to make single dose corona vaccine chinese team to help scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.