CoronaVirus : भारतात कोरोनाचा हाहाकार; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:56 PM2021-04-24T16:56:03+5:302021-04-24T16:58:53+5:30

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे.

CoronaVirus Pakistan pm Imran Khan tweeted about corona virus crisis in india know what he says | CoronaVirus : भारतात कोरोनाचा हाहाकार; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले...

CoronaVirus : भारतात कोरोनाचा हाहाकार; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले...

Next

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारतीय लोकांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सर्वांनी मिळून या जागतिक संकटाचा सामना करायला हवा. (CoronaVirus Pakistan pm Imran Khan tweeted about corona virus crisis in india know what he says)

इम्रान खान यांनी शनिवारी ट्विट करत म्हटले आहे, की 'मी भारतीयांप्रति एकता व्यक्त करू इच्छितो. ते कोरोनाच्या घातक लाटेचा सामना करत आहेत. आम्ही आमच्या शेजारील आणि जगातील कोरोनाने पीडित सर्व लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.' तसेच आपण सर्वांनी एकत्रितपणे या जागतिक संकटाचा सामना करायला हवा, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. 

CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण

याशिवाय पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही भारतीयांप्रति शनिवारी सहानुभूती व्यक्त केली. कुरेशी म्हणाले, की कोविड-19 संकट सांगते, की मानवी प्रश्नांवर राजकारणापलिकडे जाऊन पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

ते म्हणाले, 'कोविड-19 संक्रमणाने आपल्या भागात कहर केला आहे. सध्याच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयांप्रति समर्थन व्यक्त करतो. तसेच पाकिस्तानातील कोलांच्या वतीने, मी भारतात प्रभावित कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करतो.'  ते म्हणाले, या महामारीचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सार्क देशांच्या सोबतीने काम करत आहे.

भारतात कोरोनाचा धोका वाढतोय -
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे. 

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

पाकिस्तानातील स्थिती - 
पाकिस्तानात गेल्या 24 तासांत 157 जणांचा कोरोना संक्रमणाने मृत्यू झाला. तर 5,908 नवे रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमणामुळे एका दिवसात होणाऱ्या मृत्यूंचा हा आकडा गेल्या वर्षानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने म्हटले आहे,  की 157 पैकी 53 रुग्णांनी व्हेंटीलेटरवर असतानाच अखेरचा श्वास घेतला आहे. पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 16,999 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तर एकूण 7,90,016 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

Web Title: CoronaVirus Pakistan pm Imran Khan tweeted about corona virus crisis in india know what he says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.