coronavirus : शेकहॅण्ड ना सही, लेग-शेक तर आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:45 PM2020-04-13T15:45:48+5:302020-04-13T15:55:33+5:30

परस्परांना भेटण्याची, अभिवादन करण्याची रीतही कोरोना बदलून टाकेल, अशी चिन्हं आहेत.

coronavirus : people of around world changing greeting habits, no touch, nio shakehand, how shake your legs, if possible! | coronavirus : शेकहॅण्ड ना सही, लेग-शेक तर आहे!

coronavirus : शेकहॅण्ड ना सही, लेग-शेक तर आहे!

Next
ठळक मुद्देशेकहॅण्ड नको, लांबूनच हात जोडा! 

सहज कल्पना करुन पहा, आपण सगळे -म्हणजे अखील मानवजात ‘हॅलो’ म्हणूनच फोनवर विशेषत: लॅण्डलाइन फोनवर कसे बोलायला लागलो.
परस्परांना भेटलं की, एकमेकांना अभिवादन-दुआसलाम करण्याच्या प्रत्येक जाती-धर्माच्या प्रथा परंपरा वेगळ्या होत्या. भारतातच नाही तर जगभरातही त्या आजही आहेत.
मात्र फोन आला अािण निदान फोनवर तरी बहुतांशजण हॅलो म्हणू लागले. त्याअर्थानं हा हॅलो शब्द धर्मनिरपेक्ष झाला.
जी क्रांती फोनने शब्दात करुन दाखवली तीच क्रांती आता कोरोना नावाचा हा विषाणू आता वर्तनात करणार अशी चिन्हं दिसायला लागली आहे.
अलिकडेच तुम्ही एक व्हीडीओ पाहिला असेल त्यात जर्मन पंतप्रधान अंजेला मर्केल यांना शेकहॅण्ड न करता त्यांच्या एका मंत्र्यानं नमस्ते केल्याचा! जगभरच नेत्यांनी ( अगदी रशियन पुतीन सुद्धा) आदेश काढले की, आता शेकहॅण्ड नको, लांबूनच हात जोडा! 
त्यातली गंमत बाजूला ठेवली तरी, हा कोरोना लोक एकमेकांना जगभर जसे भेटतात. म्हणजे शेकहॅण्ड करतात किंवा गळाभेट घेतात ते बंद करुन दुरुनच अभिवादन करायला लावेल अशी चिन्हं आहेत. मुळात माणसांनी आनंदानं एकमेकांची गळाभेट घेणं हे परस्परांवर विश्वास ठेवणं असतं, तो विश्वास स्पर्शातून जाणवतो.


आता मात्र गळाभेट, स्पर्श, टाळून सुरक्षित अंतरावर माणसं उभी राहतील, हे परस्पर अविश्वास वाढल्याचंही लक्षण आहे.
त्याचंच एक रुप म्हणजे अमेरिकेत खुद्द ट्रम्प साहेबांनीही सांगितलं की, यापुढे लोकांनी एकमेकांना स्पर्श करु नये. नो टचिंग, नो हगिंग. अर्थात हे काही दिवस. मात्र यातून जो अविश्वास रुजेल, ती दरी भरुन यायला वेळ लागेल.
त्यातल्या तरुण मुलं मात्र यातही वस्ताद निघाली. अनेकजण आता शेकहॅण्ड न करता केवळ डाव्या कोप:यांनी एकमेकांना ‘ग्रीट’ करत आहेत. तेच काहीजण पायाला पाय लावून ‘लेग-शेक ’करत आहेत. 

शेवटी परस्परांवर विश्वास ठेवण्याचे, आपल्याला काळजी आहे हे सांगण्याचे, आनंद वाटून घेण्याचे आणि आपली भावना समोरच्यार्पयत पोहचवण्याचे अनेक मार्ग लोक शोधून काढतातच.
त्यात तरुण पिढी अग्रेसर असते. जगण्याची उमेद अशीच टिकते.
म्हणून तर शेकहॅण्ड ना सही, लेग-शेक तर आहे असं म्हणत नवा ट्रेण्डही रुजू पाहतो आहे.
बघायचं तो कोरोनोत्तर काळात टिकतो का?

Web Title: coronavirus : people of around world changing greeting habits, no touch, nio shakehand, how shake your legs, if possible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.