Coronavirus: ‘कोरोनामुळे लोक मरत असतील तरी चालेल पण अर्थव्यवस्था ढासळता कामा नये’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 01:54 PM2020-03-29T13:54:42+5:302020-03-29T13:58:09+5:30
ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या विळख्यात हजारो लोक येत असताना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
साओ पाओलो – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाने जगातील अन्यदेशांमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीनपेक्षा सर्वाधिक फटका कोरोनामुळे अमेरिकेला बसला आहे. १ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत कोरोनाची लागण झाली आहे. तर २ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या परिने प्रयत्न करत आहे. भारतातही कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या विळख्यात हजारो लोक येत असताना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी ३ हजार ४७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी बिकट परिस्थिती असतानाही राष्ट्रपती जायर बोल्सोनारो देशात लॉकडाऊन करण्याच्या विरोधात आहेत.
लोकांच्या जीवापेक्षा त्यांना अर्थव्यवस्थेतील नुकसानाची भीती जास्त सतावत आहे. कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीत हजारो लोकांचा जीव गेला असताना बोल्सोनारो यांनी केलेल्या विधानावरुन ,संताप व्यक्त करण्यात येत आहे. बोल्सोनारो यांनी म्हटलं की, लोकांनी मला माफ करावं, मात्र काही जण कोरोनामुळे मरणारच आहेत हे लज्जास्पद विधान केले आहे.
कोरोना व्हायरसमुळे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो आणि राज्यांच्या राज्यपालांमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे. काही राज्यपालांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रपती बोल्सोनारो लोकांना कामावर येण्याचं सांगत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. कोरोनोमुळे सोशल डिस्टेंसिंग करणे गरजेचे नाही असा सल्लाही त्यांनी लोकांना दिला आहे.
कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित केलं आहे. कोरोनाची जगभरात साडेसहा लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे तर ३० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमावली बनवली आहे. जगातील बहुतांश देशाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन केल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. पण लोकांच्या आरोग्यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे असं मत सर्व देशांचे आहे.
अशातच ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी काहीही झालं तरी देशात लॉकडाऊन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. काही लोक कोरोनामुळे मरतील पण त्यासाठी अर्थव्यवस्था बंद करु शकणार नाही. तसेच देशात मरणाऱ्यांची संख्या वाढवून सांगितली जात असल्याचा आरोप राष्ट्रपतींनी राज्यपालांवर केला आहे. मागील काही काळापासून या दोन्ही पदांमध्ये विवाद सुरु आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल
कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांसोबत नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'; पाहा काय मागितली मदत?
खरंच, 25 कोटी दान करणार? बायकोने विचारला प्रश्न, अक्षय कुमारचे असे दिले उत्तर
Coronaशी मुकाबला करण्यासाठी BCCIनं केलेल्या मदतीवर चाहते भडकले; म्हणाले, भीक देताय का?
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य!