CoronaVirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, WHOकडून भारताचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 11:35 AM2021-02-06T11:35:26+5:302021-02-06T11:37:16+5:30
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले (WHO praised india)
वॉशिंग्टन/नवी दिल्ली - भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर आता जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) भारताचे कौतुक केले आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी केल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए. घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे. (WHO praised india for reducing the corona viruses)
यासंदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की, आपणही या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या, तर करोना व्हायरसवर मात करू शकतो. लशीचा प्रभाव वाढल्यानंतर आपण आणखीही चागल्या परिणामांची आशा करू शकतो.
India 🇮🇳 has shown great progress in significantly driving down the number of #COVID19 cases, says @DrTedros.
— Global Health Strategies (@GHS) February 5, 2021
"This shows us that if we can do these simple public health solutions, we can beat the virus...With vaccines being added, we would even expect more and better outcomes." pic.twitter.com/T1pgVi67tm
देशात कोरोना बळींची घटतेय -
देशात कोरोना बाधित रुग्ण आढळत असले तरी, उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. हे प्रमाण आता 1.40 टक्क्यांवर आले आहे. या संसर्गातून 1 कोटी 4 लाख 96 हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण 97.16 टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो 1.43 टक्के झाला आहे.
देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 151460 -
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले असून, बळींची संख्या 154813 झाली आहे. देशात 4959445 जणांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 151460 एवढी आहे.