Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:37 AM2020-05-07T08:37:11+5:302020-05-07T08:41:17+5:30

कोरोना विषाणूसंदर्भात चीनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

Coronavirus: professor researching on corona virus was killed in an apparent murder china vrd | Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

Next
ठळक मुद्देजगभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाची माहिती जगाला देणारे पत्रकार आणि डॉक्टर्स अचानकच गायब झाले आहेत.विशेष म्हणजे आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

बीजिंगः जगभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाची उत्पत्ती ही चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून झाल्याचा अमेरिकेनं वारंवार दावा केला आहे. त्यामुळे अनेक देश चीनवर भडकलेले आहेत. त्यातच कोरोनाची माहिती जगाला देणारे पत्रकार आणि डॉक्टर्स अचानकच गायब झाले आहेत. विशेष म्हणजे आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूसंदर्भात चीनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

एका दाव्यानुसार, पिट्सबर्ग मेडिकल सेंटर येथे काम करणारे संशोधक डॉक्टर बिंग लिऊ यांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात खूप मोठा शोध लावला होता. तो शोध ते जगासमोर उघडही करणार होते, पण तत्पूर्वीच त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. चीनचं नको असलेल्या गोष्टी किंवा चीनचं पितळ तो जगासमोर उघड करणार तर नव्हता ना, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. 

बिंग लिऊवर हल्ला करणार्‍या व्यक्तीने नंतर स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. 37 वर्षीय बिंग लिऊ एकटाच राहत होता आणि रॉस भागातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून एका व्यक्तीने त्यांना गोळी घातली. सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती.
पिट्सबर्ग मेडिकल सेंटर विद्यापीठाने संशोधक लिऊच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि ते म्हणाले की, तो कोरोना विषाणूबद्दलच्या एका मोठ्या शोधाच्या जवळ आला होता आणि लवकरच त्यावर उपचार मिळणार आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर

पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता

Web Title: Coronavirus: professor researching on corona virus was killed in an apparent murder china vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.