Coronavirus : अभिमानास्पद! अमेरिकेतील प्रत्येक सातवा डॉक्टर हा भारतीय वंशाचा 'कोरोना वॉरियर'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:44 PM2020-04-27T21:44:22+5:302020-04-27T21:52:03+5:30
Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 2,07,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 2,07,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. घरापासून दूर राहून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. अशीच एक अभिमानास्पद घटना समोर आली आहे.
महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनाशी लढणारा अमेरिकेतील प्रत्येक सातवा डॉक्टर हा भारतीय वंशाचा आहे. कोरोना विरोधातील या लढ्यात तो सैनिकांप्रमाणे लढत असल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टरांची संघटना असलेल्या अमेरिकन फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (AAPI) चे अध्यक्ष डॉ. सुरेश रेड्डी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या हजारो भारतीय डॉक्टरांचे कौतुक केले आहे.
Coronavirus : कौतुकास्पद! भूक नाही तर स्वाभिमान मोठा; आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन, म्हणाले...https://t.co/JihiHnfl0R#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2020
डॉ. सुरेश रेड्डी यांनी 'अमेरिकेतील प्रत्येक सातवा डॉक्टर हा भारतीय आहे आणि कोरोना व्हायरसशी सुरू असलेल्या या युद्धामध्ये तो अग्रस्थानी उभा राहून खंबीरपणे लढत आहे. भारतीय डॉक्टर सैनिकांप्रमाणेच संकटाचा सामना करत आहेत' असं म्हटलं आहे. तसेच कोरोनाशी सुरू असलेला हा लढा बराच काळ सुरू राहणार आहे. एक-दोन महिन्यांत हा व्हायरस संपणार नाही. यावरची लस तयार होईपर्यंत कोरोना व्हायरस हा साधारण एक किंवा दोन वर्षे राहू शकतो असं देखील रेड्डी यांनी सांगितलं आहे. नियोजित पद्धतीने लॉकडाऊन काढावे लागणार आहे. अन्यथा कोरोनामुळे होणारं नुकसान हे अधिक होईल असं देखील त्यांनी म्हटलं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवरhttps://t.co/pDzuMmhZNT#coronavirus#coronaupdatesindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2020
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. उमा मधूसूदन असं या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव असून त्या सध्या साऊथ विंडसरमध्ये राहतात. उमा मधूसूदन यांनी अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले असून त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. उमा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्यारितीने सन्मान केला आहे. तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवत त्यांचा सन्मान केला. या कौतुकास्पद घटनेचा एक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कौतुकास्पद! भूक नाही तर स्वाभिमान मोठा; आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन, म्हणाले...
Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर
Coronavirus : दिल्लीत डॉक्टर, नर्ससह तब्बल 170 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका
Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार
Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video