Coronavirus: वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:21 PM2020-03-25T16:21:43+5:302020-03-25T22:42:09+5:30
अमेरिकेतील वैज्ञानिक या व्हायसरच्या वाढीवर अभ्यास करत आहेत. त्यांना एका व्हायरसपेक्षा दुसरा व्हायरस जास्त ताकदवर असल्याचे आढळलेले नाही.
वॉशिंग्टन : जागतिक महामारी म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात १८६०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात या व्हायरसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या सगळ्या उत्पातानंतर वैज्ञानिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. विषाणूच्या संहितेवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसवर दीर्घकाळ टिकवून ठेवू शकणारी लस तयार करण्याची आशा व्यक्त केली आहे.
सर्व व्हायरस काळानुसार विकसित होत जातात. एका मूळ सेलमध्ये राहून स्वत: वाढतात आणि नंतर संख्या वाढल्यावर ते आजुबाजुला पसरू लागतात. या प्रक्रियेदरम्यान काही विषाणू त्यांच्या नैसर्गिक अवस्थेतच राहतात तर काही व्हायरस त्यांचे रुप बदलतात. मात्र, कोरोना व्हायरस त्याचे रुप बदलत नाहीय. यामुळे त्याच्यावर औषध शोधणे सोपे होणार आहे. कारण जर त्या व्हायरसने स्वत:चे रुप बदलायला सुरुवात केली तर नवनवीन औषधे शोधावी लागणार आहेत. जुने औषध कालबाह्य होणार आहे.
अमेरिकेतील वैज्ञानिक या व्हायसरच्या वाढीवर अभ्यास करत आहेत. त्यांना एका व्हायरसपेक्षा दुसरा व्हायरस जास्त ताकदवर असल्याचे आढळलेले नाही. सार्स-कोव्ह -2 विषाणूमुळे कोविड - 19 आजार होतो. सार्स हा कोरोना विषाणूसारखाच आहे जो पाख्यांमध्ये आढळतो. कोरोनाचा संसर्ग गेल्या वर्षी झाला होता. हा व्हायरस पेंगोलिन जमातीपासून पसरल्याचे बोलले जाते. या प्राण्याची तस्करी औषध बनविण्यासाठी केली जाते.
वैज्ञानिक आता कोरोनाच्या वेगवेगळ्या १००० व्हायरसवर संशोधन करत आहेत. जॉ़न हाफकिन्स विद्यापीठातील आण्विक अनुवंश शास्त्रज्ञ पीटर थिलेन हे या विषाणूंचा अभ्यास करत आहेत. वुहानमध्ये पसरलेला मूळ विषाणू आणि अमेरिकेमध्ये सापडलेल्या विषाणूमध्ये केवळ चार ते १० अनुवांशिक फरक नोंदविण्यात आला आहे.