coronavirus : तिने बनवले कर्णबधिरांसाठी खास पारदर्शक मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:08 PM2020-04-13T16:08:29+5:302020-04-13T16:10:18+5:30
जी माणसं एरव्हीही बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यांचं याकाळात काय झालं असेल? सगळ्यांनी कापडाचे मास्क चेह:यावर बांधले तर त्यांच्या ओठांच्या हालचाली वाचून ही माणसं संवाद कशी साधणार?
सगळ्या जगाला लॉकडाऊनची चिंता आहे, मात्र जी माणसं एरव्हीही बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यांचं याकाळात काय झालं असेल?
एरव्ही लीप रिडींग, फेस रिडींग करणारे, साइन लॅग्वेंजद्वारे बोलणारे, ऐकणारे त्यांचं या काळात का होत असेल?
तोंडाला मास्क लावला तर ते बोलणार कसे? आणि त्यांच्यासोबत जे राहतात, त्यांनीही सगळ्यांनी कापडाचे मास्क चेह:यावर बांधले तर त्यांच्या ओठांच्या हालचाली वाचून
ही माणसं संवाद कशी साधणार? लहान मुलं, विद्यार्थी, ऑनलाइन वर्गात सध्या शिकणारी ही मुलं सगळ्यांचाच हा प्रश्न आहे.
त्यावर उत्तर शोधलं एका 21 वर्षीय तरुणीनं. ती वुडलॅण्ड काऊण्टीत राहते. स्वत: शिकतेय आणि कर्णबधीर आणि श्रवणशक्ती कमी असणा:या मुलांना शिकवतेही. सध्या ती ही घरीच आहे आणि ऑनलाइन क्लासेस घेतेय.
ते क्लास सुरु करताना तिला प्रश्न पडला की, आपण तोंडाला मास्क लावला तर या मुलांशी संवाद कसा होणार? त्यांना कळणार कसं की आपण काय बोलतोय?
तिनं तिच्या आईशी बोलून त्यावर तोडगा काढला. त्यांनी घरातल्या नव्या को:या बेडशिट्स घेतल्या आणि त्याचे मास्क शिवायला घेतले. पण मास्क लावायचा पण ओठ, हनुवटी दिसली पाहिजे
असा त्यांना पर्याय हवा होता.
मग त्यांनी घरातलंच प्लास्टिकचं फॅब्रिक वापरलं. घरातल्या काही कामांसाठी त्यांनी ते आणलेलं होतं आणि योगायोगानं एक रोल शिल्क होता.
मग त्यांनी बेडशिटचे मास्क, मध्ये पारदर्शक प्लास्टिक लावून शिवले.
मात्र ते मास्क कानावर बांधण्याचाही प्रश्न होता.
अनेक मुलं कानात श्रवणयंत्र लावतात. काहीजण अजून छोटी उपकरणं लावतात. त्यांना कानाभोवती मास्क नको म्हणून, मग त्यांनी डोक्यातून घालून गळ्याभोवती बांधता येईल असे मास्क बनवले.
अॅशली सांगते, ‘ कर्णबधीर मुलांना चेह:यावरचे भाव, ओठांच्या हालचाली दिसणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे जरा संवेदनशिल होऊन विचार केला तर कुणालाही हे सहज सुचलं असतं. आमच्या घरात पुरेसं सामान आहे, आम्ही शिवतो आहोत,
वाटतो आहोत मास्क! संवाद थांबू नये एवढीच माझी इच्छा आहे.’
तिच्या या मास्कची माहिती सोशल मीडीयामुळे अनेकांना समजली. आता अमेरिकेतल्या सहा राज्यांतून तिच्याकडे या मास्कची मागणी येते आहे. संकटकाळातही दुस:याचा विचार किती गोष्टी सोप्या करु शकतो, याचं हे पारदर्शक मास्क हे प्रतीक आहे.