Coronavirus : चीनमध्ये स्मार्टफोनमधील ‘ग्रीन सिग्नल’मुळं होतय जनजीवन सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:37 AM2020-04-03T10:37:30+5:302020-04-03T10:51:41+5:30
चीनमधील कपडे उत्पादक कंपनीच्या मॅनेजर वु शेंगहोंग यांनी वुहान सब-वे स्टेशनवर आपला स्मार्टफोन काढून तेथील एका पोस्टरवरील बारकोडवर स्कॅन केला. त्यानंतर त्यांचे ओळखपत्र आणि ग्रीन सिग्नल दिसला. त्यानंतर त्यांना सब-वेवर जाण्यास परवानगी मिळाली होती.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यात स्मार्टफोनचे ग्रीन सिग्नल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हा ग्रीन सिग्नल एकप्रकारचा आरोग्य कोड आहे. ज्यामुळे संबंधीत व्यक्तीची प्रकृती चांगली असून तो कोरोना बाधित नाही, हे स्पष्ट होते. सार्वजनिक ठिकाणी सब-वेवर किंवा हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी मोबाईलवर ग्रीन सिग्नल अनिवार्य करण्यात आले आहे.
चीनमध्ये जवजवळ सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे ग्रीन सिग्नल पद्धत यशस्वी होऊ शकली. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाकडे देशातील नागरिकांना आपल्या निगराणीत आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी येथील जनतेचा डेटा साठवण्यात आलेला आहे.
चीनमधील कपडे उत्पादक कंपनीच्या मॅनेजर वु शेंगहोंग यांनी वुहान सब-वे स्टेशनवर आपला स्मार्टफोन काढून तेथील एका पोस्टरवरील बारकोडवर स्कॅन केला. त्यानंतर त्यांचे ओळखपत्र आणि ग्रीन सिग्नल दिसला. त्यानंतर त्यांना सब-वेवर जाण्यास परवानगी मिळाली होती.
कोरोना व्हायरसचा उगम चीनमधील वुहान शहरातून झाला होता. या व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांचा चीनमधील आकडा ८१ हजारच्या पुढे गेला आहे. तर ३३०० लोकांना कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे.
इतर देशातही ही पद्धत वापरावी
ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी ‘सायन्स’ या मासिकात म्हटले की, डिजीटल कॉन्टेक्ट ट्रेसिंग संकल्पना इतर देशातील सरकारने देखील राबवावी. जेणेकरून डिजीटल माध्यमांच्या मदतीने सर्वांची माहिती उपलब्ध होऊ शकेल.