Coronavirus: आता सापाचे विष वापरून होणार कोरोवार उपचार, ब्राझीलच्या संशोधकांना मिळाली धक्कादायक माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 03:49 PM2021-09-01T15:49:09+5:302021-09-01T15:58:30+5:30

Coronavirus Update: ब्राझीलमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये सापाच्या विषामध्ये असलेल्या एक मॉलिक्यूलने माकडाच्या पेशीत असलेल्या कोरोना विषाणूला फैलावण्यापासून बऱ्यापैकी रोखल्याचे समोर आले आहे

Coronavirus: Snake venom becomes effective against corona, Brazilian researchers get shocking information | Coronavirus: आता सापाचे विष वापरून होणार कोरोवार उपचार, ब्राझीलच्या संशोधकांना मिळाली धक्कादायक माहिती  

Coronavirus: आता सापाचे विष वापरून होणार कोरोवार उपचार, ब्राझीलच्या संशोधकांना मिळाली धक्कादायक माहिती  

Next

साओ पावलो - गेल्या पावणे दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या साथीवर अद्याप खात्रीशीर इलाज सापडलेला नाही. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण केले जात आहे. (Coronavirus Update) त्यातच आता कोरोना विषाणूवर लवकरच सापाच्या विषाचा वापर करून उपचार केले जाण्याची शक्यता आहे. ब्राझीलमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये सापाच्या विषामध्ये असलेल्या एक मॉलिक्यूलने माकडाच्या पेशीत असलेल्या कोरोना विषाणूला फैलावण्यापासून बऱ्यापैकी रोखल्याचे समोर आले आहे. मात्र माणसांमध्ये कोरोनाविरोधात या विषाच्या प्रभावाबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. संशोधकांनी वेळेची माहिती न देता माणसांच्या पेशींवरही या पदार्थाची तपासणी केली जाऊ शकते, असे सांगितले. ( Snake venom becomes effective against corona, Brazilian researchers get shocking information)

विज्ञान मासिक मॉलेक्युल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनामधून समोर आले आहे की jararacussu pit viper ने माकडांच्या पेशीमधील विषाणूंच्या वाढीचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत थांबवले होते. साओ पावलो विद्यापीठातील प्राध्यापक आणि स्टडीचे लेखक राफेल गिडो यांनी सांगितले की, आम्ही हे दाखवून यशस्वी ठरलो की, सापाच्या विषामधील हा भाग कोरोना विषाणूच्या खास प्रोटीनला प्रतिबंध करू शकतो.

हे मॉलिक्यूल पेप्टाइड किंवा अमिनो अॅसिडची चेन आहे. ती कोरोना विषाणूच्या PLPro शी जोडली जाते. तसेच अन्य सेल्सचे नुकसान न करता ती विषाणूच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र तज्ज्ञांनी यासाठी सापांची शिकार करणे किंवा त्यांना पकडणे हे गरजेचे नसल्याचे सांगितले आहे. jararacussu ब्राझीलमधील सर्वात लांब सापांपैकी एक आहे. त्याची लांबी सहा फुटांपर्यंत असते.

एका मुलाखतीमध्ये गिडो यांनी सांगितले की, आपल्या अँटिबॅक्टोरियल गुणांसाठी ओखळल्या जाणारे पेप्टाइड लॅबमध्ये तयार केले जाऊ शकते. त्यामळे सापांना पकडणे किंवा पाळणे गरजेचे नाही. हर्पोटोलॉजिस्ट गिसीप पुऔर्तो यांनी सांगितले की, आम्ही ब्राझीलमध्ये त्या लोकांबाबत सावध आहोत जे आम्ही जगाला वाचवायला निघालोय असा दावा करून jararacussuची शिकार करण्यासाठी निघतील.  

Web Title: Coronavirus: Snake venom becomes effective against corona, Brazilian researchers get shocking information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.