Coronavirus: आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार; चिनी सैन्याची अमेरिकेला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 10:44 AM2020-05-07T10:44:10+5:302020-05-07T10:53:43+5:30
एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे.
बीजिंगः चीन आणि अमेरिका या जगातील दोन महाशक्तींमध्ये कोरोनामुळे तणाव वाढत आहे. चिनी सैन्य दक्षिण चीन समुद्रात आक्रमकपणे वागत असल्याचा अमेरिकेनं आरोप केला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा चीनचा आरोप आहे. वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीतच चिनी युद्धनौकांनी दक्षिण चिनी समुद्रात युद्धाचा सराव केला आहे. त्याचदरम्यान, अमेरिकेने अलास्कामध्ये एफ-35 लढाऊ विमानांना युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत. चिनी सैन्याने म्हटले आहे की, ते अमेरिकेविरोधातल्या कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहेत. एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे.
चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी मंगळवारी सांगितले की, चीनचं सैन्य दक्षिण चिनी समुद्रात आक्रमक भूमिका घेत आहे. कोरोना विषाणू पसरवल्याचा त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्याचं अभियान चालवत आहे.
दक्षिण चिनी समुद्रात पीपल्स लिबरेशन आर्मीचा आक्रमक पवित्रा
चिनी कम्युनिस्ट पक्षाने या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे, असं एस्पर यांनी पेंटागॉन येथे पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही दक्षिण चिनी समुद्रात पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी)चा आक्रमक पवित्रा सातत्याने पाहत आहोत. फिलिपिन्सच्या नौदलाच्या जहाजाला धमकावणे, व्हिएतनामची फिशिंग बोट बुडविणे आणि ऑफशोर ऑईल आणि गॅस संबंधित इतर देशांना धमकावणे, अशा पद्धतीनं चीन वागत आहे.
एस्पर म्हणाले की, जागतिक महामारीमुळे बरेच देश त्यांच्या कोरोनाच्या संकटाशी झगडत आहेत. त्याचदरम्यानच्या काळात अमेरिकेचे सामरिक प्रतिस्पर्धी स्वतःच्या फायद्यासाठी संकटाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, कोरोना विषाणूबद्दल चीन सुरुवातीपासूनच पारदर्शक नव्हता. जर चीन अधिक पारदर्शक झाला असता, तर 'आम्हाला या विषाणूची तीव्रता समजू शकली असती आणि कदाचित सध्याच्या परिस्थिती जगाला पाहावी लागली नसती.
दक्षिण चिनी समुद्रात चीनचा थेट युद्धसराव
अमेरिकेबरोबर युद्धाची वेळ आल्यास चीननेही आपल्या तयारीला वेग दिला आहे. चिनी विमानवाहू जहाजं, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी थेट युद्धसराव सुरू केला आहे. चिनी सैन्याने म्हटले आहे की. ते अमेरिकेविरोधातल्या कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहोत. एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे. अमेरिका या भागात सतत आपले सैन्य जहाज पाठवत असताना चीनने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे पाळत ठेवणारी विमानेही या भागास नियमित भेट देत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी
Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या
CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता