CoronaVirus: कोरोनाचा जन्म चीनमधला; पण 'या' देशांना सर्वाधिक फटका; आकडेवारी पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:55 PM2020-04-01T16:55:19+5:302020-04-01T16:55:58+5:30

coronavirus चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा अमेरिकेसह युरोपीय देशांना मोठा फटका

CoronaVirus spread from china kills 25 thousand in america spain italy altogether kkg | CoronaVirus: कोरोनाचा जन्म चीनमधला; पण 'या' देशांना सर्वाधिक फटका; आकडेवारी पाहून बसेल धक्का

CoronaVirus: कोरोनाचा जन्म चीनमधला; पण 'या' देशांना सर्वाधिक फटका; आकडेवारी पाहून बसेल धक्का

Next

मुंबई: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं आतापर्यंत हजारो जणांचा जीव घेतला आहे. तर आठ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. चीनच्या अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. मात्र चीननं सध्या तरी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसतं आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका युरोप आणि अमेरिकेला बसला आहे. विशेष म्हणजे या देशांना बसत असलेला फटका चीनपेक्षा अधिक आहे.

वर्ल्डोमीटर हे संकेतस्थळ कोरोनाबाधितांचा आकडा, मृतांची संख्या याबद्दलची माहिती देतं. या संकेतस्थळानं आजपर्यंत (१ एप्रिल) दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात ८ लाख ७२ हजार ९७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४३ हजार २७५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनामधून बरे झालेल्यांची संख्या १ लाख ८४ हजार ५९४ इतकी आहे. 

चीनमध्ये सर्वप्रथम कोरोना विषाणू आढळून आला. कोरोनानं चीनमध्ये ३ हजार ३१२ जणांचा बळी घेतला. चीनमध्ये ८१ हजार ५५४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातले ७६ हजार २३८ जण यातून बरेदेखील झाले. चीनमधून कोरोना युरोपात पोहोचला. इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. सध्याच्या घडीला इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ५ हजार ७९२ इतकी असून १२ हजार ४२८ जणांनी जीव गमावला आहे. तर केवळ १५ हजार ७२९ जण रुग्णालयातून घरी परतले आहेत.

युरोप खंडातल्याच स्पेनमध्येही कोरोनानं थैमान घातलं. स्पेनमध्ये कोरोनाचे १ लाख २ हजार १३६ रुग्ण असून मृतांचा आकडा ९ हजार ५३ वर पोहोचला आहे. स्पेनमधले २२ हजार ६४७ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. युरोपनंतर अमेरिकेला कोरोनाचा फटका बसला. अमेरिकेत सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. १ लाख ८८ हजार ६३९ अमेरिकन व्यक्ती सध्या कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ४ हजाराच्या पलीकडे पोहोचला आहे. तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार २५१ इतकी आहे. 

अमेरिका, इटली, स्पेनसोबतच जर्मनी, फ्रान्स, इराणमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. जर्मनीत ७२ हजार ३८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ७८८ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये ५२ हजार १२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३ हजार ५२३ इतका आहे. इराणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार ५९३ इतकी असून ३ हजारहून अधिक जणांनी जीव गमावला आहे.
 

Web Title: CoronaVirus spread from china kills 25 thousand in america spain italy altogether kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.