CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:35 PM2020-04-27T15:35:06+5:302020-04-27T15:37:17+5:30
कोरोना व्हायरस थुंकी, लाळ, शिंकणे, खोकण्यामुळे पसरत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. इबोला पुरुषाचा सीमेनमध्ये 2.5 वर्षे जिवंत राहू शकतो. तर झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्याच्या काही महिन्यांनंतर रुग्णाच्या सीमेनमध्ये सापडला होता.
कोरोना व्हायरस थुंकी, लाळ, शिंकणे, खोकण्यामुळे पसरत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. मात्र, शारीरिक संबंध ठेवल्याने कोरोना पसरु शकतो का, यावर चीनमध्ये संशोधन करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार आतापर्यंत कोरनाची लागण झालेल्या पुरुषांच्या सीमेन म्हणजेच विर्यामध्ये कोरोना व्हायरस आढळलेला नाही. महत्वाचे म्हणजे याआधी आलेले इबोला आणि झिका व्हायरस सीमेनमध्ये वर्षानु वर्षे जिवंत राहत असल्याचे समोर आले होते.
हा अभ्यास कोरोनाचा उद्रेक झालेल्या वुहानमध्ये छोट्या प्रमाणावर करण्यात आला आहे. यासाठी कोरोना झालेल्या ३४ पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यांचे सीमेन तपासले असता त्यामध्ये कोरोना व्हायरस आढळला नाही. इबोला पुरुषाचा सीमेनमध्ये 2.5 वर्षे जिवंत राहू शकतो. तर झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्याच्या काही महिन्यांनंतर रुग्णाच्या सीमेनमध्ये सापडला होता.
या संशोधनामध्ये ३१ ते ४९ वर्षांच्या पुरुषांना सहभागी करण्यात आले होते. हे लोक कोरोना व्हारसचे उपचार घेत होते. बरे झाल्यानंतरही त्यांचे वीर्य एक महिन्याच्या अंतराने तपासण्यात आले. यावेळीही संशोधकांना त्यात कोरोना सापडला नाही.
घाम आणि थुंकीवर काही संशोधन नाही
हा अभ्यास सीमेनवर केंद्रीत होता. यामुळे कोरोना बाधित व्यक्तीचा घाम आणि थुंकीमधून कोरोना व्हायरस पसरतो का यावर अभ्यास केला गेला नाही. ज्यांच्यात कोरोनाची मध्यम लक्षणे होती त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, कोरनामुळे गंभीर असलेल्या रुग्णाबाबत सांगता येत नसल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
अन्य बातम्या वाचा...
यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन
एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले
CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब
युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला
किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण किम यो जोंग