Coronavirus : बापरे! अन्न वाटप करताना झाली चेंगराचेंगरी, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 09:40 PM2020-04-11T21:40:27+5:302020-04-11T21:43:10+5:30
Coronavirus : या चेंगराचेंगरीत काहीजण जखमी झाले असून जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
नैरोबी - इतर देशाप्रमाणे केनियातील सरकारने करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत.त्यामुळे हजारो गरिबांना अन्नवाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गरीब नागरिकांना शुक्रवारी अन्नवितरण केंद्रामध्ये प्रचंड गर्दी केली होती. अन्नधान्य मिळवण्यासाठी लोक धक्काबुक्की करून गेटमधून आत घुसू लागल्याने चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी अश्रुधूराचे सोडून परिस्थिती नियंत्रणात आणली. या चेंगराचेंगरीत काहीजण जखमी झाले असून जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
नैरोबीच्या किबेरा झोपडपट्टीतील रहिवाशांनी अन्नधान्याचे वाटप करत असताना जिल्हा कार्यालयाबाहेरील गेटमधून घुसून जाण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेतील ४३ देशांच्या पाच हजार रुग्णालयातही कमी आयसीयू बेड असल्याची माहिती आरोग्य संघटनेच्यावतीने देण्यात आली. आफ्रिकेत सध्या ११ हजार ५०० जणांना करोनाची बाधा झाली असून ५७० जणांचा मृत्यू झाला आहे.
एव्हलिन केमूंटो या रहिवाश्याने सांगितले की, "इथं जखमी झालेले लोक बरेच आहेत, मोजू शकलो नाही." "महिला आणि मुले दोघेही जखमी झाले आहेत. जुळी मुलं आईसहित जखमी झाली होती आणि आतासुद्धा ती आपल्या जुळ्या मुलांचा शोध घेत आहे. आपण उपासमारीने मरत असल्याने हे पदार्थ आपण घेत होतो." लोकप्रिय विरोधक नेत्या रायला ओडिंगाने अन्नदान केले होते, असे मोटारसायकल टॅक्सी चालवणारे रिचर्ड कोंगो या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. परंतु प्रत्यक्षात हे वितरण दुसर्या हितचिंतकांचे होते, ज्यांनी मदत करण्यासाठी काही निवडक कुटुंबांना कार्ड दिले होते.