CoronaVirus: मासिक पाळी रोखा, गोळ्या खा! चीनचा फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 08:45 PM2020-03-07T20:45:22+5:302020-03-07T20:57:14+5:30
CoronaVirus: सरकारने असे आदेश दिल्याने मेडिकलमध्येही रांगा लागल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्भ निरोधक गोळ्या, मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांची मागणी अचानक वाढल्याने त्या मिळत नाहीत.
बिजिंग : कोरोना व्हायरसची चीनने चांगलीच धास्ती घेतलेली आहे. एकमेकांसोबत हस्तांदोलन करण्यावर बंदी असताना त्यांच्या मोठ्या शहरामध्यील रस्त्यांवरही कधी नव्हे तेवढा शुकशुकाट आहे. चीन सरकारने या संकटाची एवढी धास्ती घेतली आहे की, महिलांना मासिक पाळी पुढे ढकलण्य़ासाठी दबाव आणला जात आहे. सरकारनेच असे निर्देश दिल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सरकारने असे आदेश दिल्याने मेडिकलमध्येही रांगा लागल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्भ निरोधक गोळ्या, मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांची मागणी अचानक वाढल्याने त्या मिळत नाहीत. याचबरोबर महिला मासिक पाळीशी संबंधीत उत्पादने न मिळणे, खराब फिटिंगचे सुरक्षेचे सूट आणि टक्कल करण्यासारख्या समस्यांपासून त्रस्त झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सरकारने तेथील महिला डॉक्टर आणि नर्सना मासिक पाळी लांबणीवर टाकण्यासाठी औषधेही दिली आहेत.
आज जगभरात महिला दिन साजरा करण्यात आला. मात्र, याच दिवशी ही धक्कादायक बातमी आली आहे. यामुळे सरकारविरोधात महिला संघटना एक व्हायला लागल्या आहेत. कपडे घाणेरडे न करण्यासाठी शौचालयांचा वापर न करण्यास या संघटनानी सांगितले आहे.
शांघायची 24 वर्षीय जियांग जिनजिंग हीने ट्विटरसारखेच सोशल मिडीया प्लॅटफॉर्म विबोवर नाराजी व्यक्त केली आहे. यावर तिला मोठा पाठिंबा मिळत आहे. याच मुलीने सॅनिटरी नॅपकीन दान करण्याची मोहिम उघडली आहे. तिला अनेक महिला कर्मचाऱ्यांनी संदेश पाठवून मासिक पाळीदरम्यान मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.