CoronaVirus आश्चर्य! जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 07:40 PM2020-04-01T19:40:24+5:302020-04-01T19:41:18+5:30
काही देश असे आहेत जिथे कोरोनाचे नामोनिशान नाहीय. यामध्ये उत्तर कोरियाही आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेची जॉन हाफकिन्स विद्यापीठ कोरोना व्हायरसच्या अद्ययावत माहितीसाठी जगभरातील देशांकडून माहिती मिळवत आहे. याचा वापर जगातील सर्वाधिक वृत्तसंस्था आणि सरकार करत आहेत. विद्यापीठाच्या डेटाबेसनुसार कोरोना व्हायरस आतापर्यंत जगातील १८० देशांपर्यंत पोहोचलेला आहे.
मात्र काही देश असे आहेत जिथे कोरोनाचे नामोनिशान नाहीय. यामध्ये उत्तर कोरियाही आहे. किम जोंग सरकारने सांगितले आहे की त्यांच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. उत्तर कोरियाच्या सीमा चीन आणि दक्षिण कोरियाला लागून आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण चीनमध्ये तर कोरोनाची सुरुवात झाली आहे.
विद्यापीठाच्या ३१ मार्चच्या माहितीनुसार आफ्रिका खंडातील काही देश असे आहेत जिथे कोरोना व्हायरस पोहोचलेला नाही. बोत्सवाना, तुर्कमेनिस्तान, तजाकिस्तान, येमेन, कोमोरोस, मलावी, साओ तोमे अँड प्रिंसिपी, दक्षिण सुदान हे असे देश आहेत जिथे कोविड-१९ चा एकही रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय सोलोमन आईसलँड, वानूआतू सारख्या आईसलँडही कोरोनापासून बचावलेले आहेत.
जगभरात कोरोनाने कहर मांडला असून रुग्णांची संख्या ८ लाखांवर गेली आहे. तर मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जगभरात ४२ हजारावर कोरोनाचे बळी गेले आहेत. तर या व्हायरसने १८० देशांना कवेत घेतले आहे. अमेरिकेमध्ये चीनपेक्षा जास्त ४०५५ मृत्यू झाले आहेत. तर संक्रमितांची संख्या १८८५९२ झाली आहे. यानंतर इटलीचा नंबर लागत आहे. इटलीमध्ये १०५७९२ कोरोनाग्रस्त आहेत. तर सर्वाधिक मृत्यू हे इटलीतच झालेले आहेत. इटलीमध्ये १२४२८ बळी गेले आहेत.