coronavirus survivor : 104 वर्षाच्या आजींची ‘अदा’ कोरोनावर केली मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:55 PM2020-04-13T16:55:38+5:302020-04-13T16:57:57+5:30
इटलीतली ही अदा आजी. अदा झानुसो असं आजींचं नाव
देव तारी त्याला कोण मारी किंवा आयुष्याची दोरी बळकट असणं या म्हणी एरव्ही आपण सहज वापरतो. मात्र सध्या सारं जग या म्हणींचा अर्थ नव्यानं समजून घेत आहे.
त्याचंच एक उदाहरण म्हणजे इटलीतली ही अदा आजी. अदा झानुसो असं आजींचं नाव. त्या 104 वर्षाच्या आहेत. त्या ज्या नर्सिग होम मध्ये रहायच्या तिथं कोरोना पोहोचला. वृद्धांचा काळ ठरला. आजींच्या नर्सिग होममधल्या 2क् जणांनी कोरोनासमोर माघार घेतली. आजींनाही लागण झाली. ताप, उलटय़ा, श्वास घ्यायला त्रस होणं सुरु झालं.
त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मात्र आजींची जगण्याची उर्मी दांडगी. त्यांनी औषधांना प्रतिसाद दिला. त्यांच्या डॉक्टर सांगतात की, ‘आजींना त्रस खूप होत होता. वृद्ध दगावत होते हे आम्ही पाहतच होतो. त्याच आजींचं वय जास्त.मात्र त्यांच्या प्रतिकार शक्तीला त्यांच्यातल्या खळाळत्या उत्साहानं आणि मिश्किल बौद्धिक ताकदीनं साथ दिली आणि आजी ब:या होत स्वत:हून पलंगावरुन उठून व्हील चेअरमध्ये जाऊन बसल्या. त्या ब:या झाल्या, याचा आनंद मोठा आहे.!‘
कोरोनाला धोबीपछाड देत ब:या झालेल्या लढवय्या आजी जगातल्या सगळ्यात वयस्कर ‘सव्र्हायव्हर’ आहेत. त्याआधी दुस:या महायुद्धात लढलेले 104 वर्षाचे आजोबा विल्यम विल्स यांनीही कोरोनाला असंच हरवलं. चीन आणि इराणमध्येही 103 वर्षाच्या आज्यांनी कोरोनाला मात दिली.
जगण्याची इच्छा अशी लढवय्ये घडवते. अदा आजी आता ब:या होऊन पुन्हा नर्सिग होममध्ये रहायला रवाना झाल्या आहेत, नव्या उमेदीसह.