CoronaVirus News: ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 02:59 PM2020-06-06T14:59:04+5:302020-06-06T14:59:42+5:30

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेची तुलना चीन आणि भारतासोबत

CoronaVirus then india will have more patients than america Trump Invites Comparison | CoronaVirus News: ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा

CoronaVirus News: ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा

Next

वॉशिंग्टन: भारत आणि चीननं अधिक कोरोना चाचण्या केल्यास त्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेनं आतापर्यंत २ कोटी चाचण्या केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी इतर देशांमधील कोरोना चाचण्यांची आकडेवारी दिली. जर्मनीनं ४० लाख चाचण्या केल्या आहेत. तर सर्वाधिक चर्चा झालेल्या दक्षिण कोरियात करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीस लाखांच्या घरात असल्याचं ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ३६ हजार १८४ जणांना, तर चीनमध्ये ८४ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतानं आतापर्यंत ४० लाख जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे. 

अमेरिकेनं आतापर्यंत २ कोटींहून जास्त कोरोना चाचण्या घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तुम्ही जितक्या जास्त चाचण्या घेता, तितके जास्त रुग्ण आढळून येतात, असं ट्रम्प यांनी म्हटलं. 'जितक्या जास्त चाचणी होतील, तितके जास्त रुग्ण सापडतील. आपण जास्त चाचण्या घेत असल्यानं रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे,' असं म्हणत असताना ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा संदर्भ दिला. 'चीन आणि भारतानंदेखील चाचण्यांची संख्या वाढवल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील,' असं ट्रम्प म्हणाले.

जगातील कोरोना बाधितांची संख्या ६८ लाखांहून जास्त आहे. यात अमेरिकेचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील १९ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही अमेरिकेत लक्षणीय आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ४ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यातले १ लाखांहून अधिक जण एकट्या अमेरिकेतले आहेत. 

Web Title: CoronaVirus then india will have more patients than america Trump Invites Comparison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.