coronavirus: कोरोनाचा हवेतून प्रसार होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - डब्ल्यूएचओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:51 AM2020-07-08T06:51:38+5:302020-07-08T06:51:57+5:30
हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. अशा संसर्गाची शक्यता आम्हीही तपासत आहोत.
जिनिव्हा : ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीने पुन्हा जोर पकडल्यावरून याचा प्रसार हवेतूनही होत असावा, अशी शंका अनेक वैज्ञानिकांनी पत्र पाठवून व्यक्त केली असली तरी अशा संसर्गाचे ठोस पुरावे अजून तरी समोर आलेले नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.
वैज्ञानिकांच्या पत्राविषयी संघटनेच्या संसर्गविषयक तज्ज्ञ डॉ. बेनेडेट्टा अॅलेग्रान्झी म्हणाल्या की, हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. अशा संसर्गाची शक्यता आम्हीही तपासत आहोत. ‘डब्ल्यूएचओ’च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, समोर येणाऱ्या नव्या माहितीची, विश्वासार्हतेशी तडजोड न करता, शहानिशा केली जाते. प्रत्येकाचे म्हणणे आम्ही नक्कीच गांभीर्याने विचारात घेतो. आताच्या या पत्राच्या बाबतीतही भूमिका तीच असेल. (वृत्तसंस्था)