Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:10 PM2020-04-28T16:10:57+5:302020-04-28T16:11:37+5:30

Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

Coronavirus top er doctor who treated coronavirus patients suicide in us SSS | Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या

googlenewsNext

वॉशिंग्टन - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 207,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 30 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,014,073 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 888,543 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरनेआत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील मॅनहॅटनमधील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या प्रसिद्ध डॉक्टरेआत्महत्या केली आहे. लॉरेन एम ब्रीन असं 49 वर्षीय आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव असून त्या आपत्कालीन विभागाच्या वैद्यकीय संचालक होत्या. गेल्या महिन्याभरापासून लॉरेन कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचं काम करत होत्या. लॉरेन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या नातेवाईकांना आणि रुग्णालय प्रशासनाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. लॉरेन यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 

लॉरेन यांच्या वडिलांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी मॅनहॅटन शहरातील न्यूयॉर्क-प्रेस्बेटीरियन अ‍ॅलन रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या वैद्यकीय संचालक होती आणि तिने रविवारी शेरलॉट्सविले येथे घरात आत्महत्या केली. शेरॉट्सविले पोलीस विभागाचे प्रवक्ते टायलर हॉन यांनी रविवारी लॉरेन यांच्या घरून आपत्कालीन नंबरवर कॉल आला आणि नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

लॉरेन यांच्या वडिलांनी त्या कोरोनाविरोधातील लढ्यात मानसिकदृष्ट्या निरोगी होत्या आणि देशातील आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांसोबत काम करत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे त्यांना काळजी वाटत होती असं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. जगावर कोरोनाचे संकट आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर

Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

 

Web Title: Coronavirus top er doctor who treated coronavirus patients suicide in us SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.