coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेचा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला कठोर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 08:06 AM2020-05-30T08:06:34+5:302020-05-30T08:28:08+5:30

कोरोना विषाणूच्या फैलावासाठी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासूनच चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

coronavirus: United States terminating relationship with WHO - Donald Trump BKP | coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेचा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला कठोर निर्णय

coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेचा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला कठोर निर्णय

Next
ठळक मुद्देजागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडण्याची अमेरिकेची घोषणाजागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका भरीव मदत करत असतानाही ही संघटना चीनच्या कलाने काम करत असल्याचा आरोप कोरोनामुळे जगभरात होत असलेल्या मृत्यूंसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीन जबाबदार असल्याचा ट्रम्प यांचा आरोप

वॉशिंग्टन - चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाचा सर्वाधिक फटका अमेरिकाले बसला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावासाठी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासूनच चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अखेर आज अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला मोठा दणका दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका भरीव मदत करत असतानाही ही संघटना चीनच्या कलाने काम करत असल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले अमेरिकेचे संबंध संपवण्याची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणले की, दरवर्षी केवळ ४ कोटी डॉलर एवढी रक्कम मदत म्हणून देणाऱ्या चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. दुसरीकडे अमेरिका मात्र या संघटनेला दरवर्षी ४५ कोटी डॉलरची मदत देत आली आहे. जागतिक आरोग्य संघटना योग्य त्या सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे आजपासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडत आहोत, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

दरम्यान, सध्या अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येत असलेला निधी हा आता जगातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य संघटनांना देण्यात येईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे जगभरात होत असलेल्या मृत्यूंसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीन जबाबदार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

कोरोना विषाणू हा वुहान विषाणू असल्याचाही ट्रम्प यांनी यावेळी पुनरुच्चार केला. चीनने वुहान विषाणूला लपवून कोरोनाला जगभर पसरू दिले. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाने जागतिक महामारीचे रूप घेतले. त्यात एक लाखांहून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच जगातही लाखो लोक मृत्यूमुखी पडले, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

Web Title: coronavirus: United States terminating relationship with WHO - Donald Trump BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.