CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:38 IST2021-06-04T14:36:27+5:302021-06-04T14:38:04+5:30
सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.

CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!
संपूर्ण जगात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. यातच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर कोरीयाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उनने (Kim Jong Un)सर्व कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचा कृर आदेश दिला आहे. कारण कबूतरं आणि मांजरं चीनच्या सीमेच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पसरवतात, असे उनचे म्हणणे आहे. दैनिक एनकेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी हुकूमशहा जोंग उनकडून अनेक उपाय योजनांची घोषणा करण्यात आली आहे. (CoronaVirus An unprecedented move to stop covid spread kim jong un orders officials to eliminate cats and pigeons)
उत्तर कोरियाच्या हुकूनशहाचा अभूतपूर्व आदेश -
कोरोनाला लगाम घालण्याच्या उपायांत, एक आदेश, भटक्या मांजरांना मारणे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालणे, असाही आहे. नुकतेच सीमेजवळील हेसन येथे एका कुटुंबाला शिक्षा देण्यात आली होती. आपल्या घरात मांजर पाळण्यासाठी त्यांना 20 दिवस आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले होते. सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.
कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!
कोरोना रोखण्यासाठी मांजरी आणि कबुतरं मारा -
हुकूमशहा जोंग उन यांचा अंदाज आहे, की हे प्राणी आणि पक्षी चीनला लागून असलेल्या सीमेवरून धोकादायक व्हायरस आणत आहेत. रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की कोरियातील नागरिकांनी हा आदेश अतार्कीक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी एक असेही वृत्त आले होते, की उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांत चिनी औषधांच्या वापरावर बंदी घातली होती. मांध्यमांतील वृत्तांनुसार, 60 वर्षीय ब्यूरोक्रॅट हृदयाच्या आजाराचा सामना करत होता आणि जोंग उनच्या जवळचा म्हणून परिचित होता.
किम जोंग उनच्या क्रूर बहिणीच्या आदेशावरून उच्च अधिकाऱ्याची हत्या, उत्तर कोरियात दहशत
बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या -
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या आदेशावरून पुन्हा एकदा त्यांच्या फायरिंग स्क्वाडने एका व्यक्तीला निशाणा बनवले. यावेळी दक्षिण कोरियाई सिनेमा आणि म्युझिक सीडी अवैधरित्या विकणाऱ्याला 500 लोकांसमोर गोळ्या मारण्यात आल्या आहेत. डेलीएनकेच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीचे अखेरचे नाव ली असे होते. तो वॉनसन फार्मिंग मेनेजमेंट कमीशनमध्ये चीफ इंजिनिअरचे काम करत होता.