coronavirus : वुहानमधील त्या लॅबमधून अशा प्रकारे पसरला कोरोना, अमेरिकी माध्यमांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:58 PM2020-04-18T17:58:08+5:302020-04-18T18:00:30+5:30
कोरोनाच्या संक्रमणामुळे अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आले आहेत
न्यूयॉर्क - चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आले आहेत. दरम्यान, अमेरिकी प्रसार माध्यमांनी वुहानमधील लॅबमधून झालेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत धक्कादायक दावा केला आहे.
वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एखाद्या इंटर्नकडून कोरोना विषाणू अपघाताने लीक झाला असावा, असा दावा फॉक्स न्यूज या अमेरिकन वृत्तवहिनीने केला आहे.
कोरोना विषाणू हा जैविक अस्त्र नाही. चीनमधील वुहान येथे असलेल्या लॅबमध्ये कोरोनासारख्या अनेक विषाणूंचा अभ्यास केला जातो. तिथूनच हा विषाणू पसरला. कोरोनाचा पहिला रुग्ण हा या लॅबमधीलच असल्याचा दावाही फॉक्स न्यूजने केला आहे.