coronavirus: कोरोनाचा फटका : अमेरिकेत एच-१ बी व्हिसा देणे बंद करण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 02:10 AM2020-05-10T02:10:12+5:302020-05-10T02:11:02+5:30
ट्रम्प सरकार परदेशी नागरिकांना दिला जाणारा एच-१ बी व्हिसा, तसेच विद्यार्थी व्हिसा ज्यात काही कालखंडासाठी काम करण्याची अनुमती दिली जाते, हे देणे काही काळासाठी तात्पुरते बंद करण्याच्या विचारात आहे.
वॉशिंग्टन - कोरोना संसर्गाच्या काळात अमेरिकेत बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील लोकांना नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ट्रम्प सरकार परदेशी नागरिकांना दिला जाणारा एच-१ बी व्हिसा, तसेच विद्यार्थी व्हिसा ज्यात काही कालखंडासाठी काम करण्याची अनुमती दिली जाते, हे देणे काही काळासाठी तात्पुरते बंद करण्याच्या विचारात आहे. एच-१ बी व्हिसा आयटी क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या भारतीयांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या धोरणाचा थेट फटका अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांना बसू शकतो.
एच-१ बी व्हिसाच्या आधारे भारत आणि चीनमधून येणाºया विदेशी नागरिकांना अमेरिकेतील बड्या कंपन्या कामावर रुजू करून घेत असतात. अशा प्रकारच्या व्हिसावर तब्बल ५ लाख विदेशी नागरिक अमेरिकेत नोकºया करीत आहेत. यातील अनेकांना तिथे कायमस्वरूपी राहता येते.
अमेरिकेच्या अध्यक्षांचे इमिग्रेशन सल्लागार अशा प्रकारचे एच-१ बी व्हिसा, तसेच ठराविक काळासाठी देण्यात येणारे एच-२ बी व्हिसा सध्या काही काळासाठी दिले जाऊ नयेत, या दिशेने धोरण आखत आहेत. या महिन्यात या धोरणाला अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे मागील २ महिन्यांत ३.३ कोटी अमेरिकन लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. या काळात येथील अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ही गंभीर स्थिती लक्षात घेता ट्रम्प सरकारने परदेशी व्यक्तींना दिल्या जाणाºया नागरिकत्वाबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशाच्या सीमा आधीच इतरांसाठी बंद केल्या आहेत. नवीन स्थलांतरितांना येण्यासाठी ६० दिवसांसाठी तात्पुरत्या बंदीचे आदेश ट्रम्प यांनी मागच्याच महिन्यात दिले होते. (वृत्तसंस्था)
अर्थव्यवस्था गंभीर संकटात
14.7% अमेरिकेत एप्रिलमधील बेकारीचा दर. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने येणारा काळ अमेरिकेच्या अर्थव्यस्थेसाठी संकटाचा असेल, असे भाकीत वर्तविले आहे. दुसºया तीन महिन्यांत अमेरिकन अर्थव्यवस्था उणे १५ ते २० टक्क्यांनी वाढेल, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.