CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! प्रगत अमेरिकाही हतबल, ऑक्सिजनची मोठी कमतरता; मुलांमध्ये संसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 03:55 PM2021-08-30T15:55:54+5:302021-08-30T16:00:25+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.
अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील रुग्णालयात बेड आणि स्टाफची कमतरता होती. मात्र आता ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि लुईसियानासारख्या राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. डोना क्रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ऑक्सिजन टँक हे 90 टक्के भरले जातात. जेव्हा टँकमध्ये 40 ते 50 टक्के ऑक्सिजन शिल्लक असतो तेव्हा तो टँक पुन्हा भरला जातो. मात्र आता 10 ते 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक राहिल्यावर तो भरण्यात येत आहे.
CoronaVirus Live Updates : भीषण! कोरोना मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने शवगृहात जागाच शिल्लक नाही....#CoronavirusUpdates#coronavirus#Americahttps://t.co/INgZsiHWt5
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021
कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेत शाळा सुरू करण्यात आल्यामुळे मुलांमध्ये वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने चिमुकल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. फ्लोरिडामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! कोरोना कानावर करतोय 'अटॅक'; रुग्णांमध्ये 'या' समस्या, वेळीच व्हा सावध#Corona#CoronavirusUpdates#Earhttps://t.co/VOn2xaBuMg
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021
कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर
अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रांतात सध्या 17 हजारांहून अधिक रुग्ण भरती आहेत. अमेरिकेतील वाढत्या रुग्णसंख्येने रेकॉर्ड केला आहे. मृतांचा आकडा तर सातत्याने वाढत आहे. यासाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सहा लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनातून ठीक झाल्यावरही रुग्णांमध्ये 'ही' लक्षणं; तज्ज्ञांच्या चिंतेत भर#coronavirus#CoronavirusUpdateshttps://t.co/ntufcag6O0
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021