...तर एका वर्षात तयार होऊ शकते कोरोनाची लस, बिल गेट्स यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:33 PM2020-04-28T23:33:36+5:302020-04-28T23:53:37+5:30
गेट्स सध्या कोरोना व्हायरसवरील लसीवर काम करत असलेल्या सात प्रोजेक्ट्सना फंडिंग करत आहेत. त्यांनी भारताचेही कौतुक केले आहे.
वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी मोठा दावा केला आहे. जर सर्वकाही योजनेप्रमाणे सुरू राहीले, तर कोरोना व्हायरसवरील लस एका वर्षात जगासमोर येऊ शकते, असे गेट्स यांनी म्हटले आहे. सध्या, गेट्स कोरोना व्हायरसवरील लसीवर काम करत असलेल्या सात प्रोजेक्ट्सना फंडिंग करत आहेत.
गेट्स म्हणाले, 'जर सर्वकाही योजनेनुसार सुरू राहिले, तर आम्ही एका वर्षाच्या आत लसीचे उत्पादन सुरू करू शकतो. याला फार तर दोन वर्षे लागू शकतात. जसेकी, काही लोक म्हणत आहेत, मला नाही वाटत सप्टेंबरपर्यंत लस तयार होऊ शकेल, असेही गेट्स म्हणाले.
वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात
'डॉ. अँथोनी फॉसी यांनी अंदाज लावला आहे, की यासाठी 18 महिने लागू शकतात. जे फार अधिक नाहीत,' असेही गेट्स म्हणाले. डॉ. फॉसी हे व्हाइट हाऊसमधील कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य आहेत आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शिअस डिसीजचे संचालक आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे
गेट्स यांनी भारताचेही केले आहे कौतुक -
गेट्स यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले होते. यात गेट्स म्हणाले होते, कोरोनाविरुद्धच्या युद्धात तुम्ही आणि तुमच्या सरकारने वेळेत, ज्या प्रकारे महत्त्वाची पावले उचलली आहेत, ती कौतुकास्पद आहेत. कोरोनाच्या युद्धात भारताने आपल्या डिजिटल शक्तीचा पुरेपूर उपयोग केला आहे आणि मला त्याचा अधिक आनंद आला आहे, असे गेट्स यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले. आरोग्य सेतू मोबाइल अॅप सरकारने सुरू केले असून, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. या अॅपच्या मदतीने आपण कोरोनाग्रस्त असलेला परिसर किती सुरक्षित आहे हे सहज शोधू शकतो.
CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध