coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:04 AM2020-07-05T03:04:09+5:302020-07-05T03:04:53+5:30

चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती.

coronavirus: WHO team to visit China for inspection Corona virus | coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार

coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार

Next

जीनिवा/नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणुंचा संसर्ग झाल्याचे आम्हाला चीनने कळविलेच नाही. आम्हाला आमच्या तेथील कार्यालयाकडून त्याची माहिती मिळाली, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. चीनने ही बाब लपवूनच ठेवली, अशाच आरोग्य संघटनेचा स्पष्ट सूर आहे.

आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती. त्यानंतर आरोग्य संघटनेने हे नेमके काय प्रकरण आहे, अशी विचारणा चीन सरकारकडे दोनदा केली. त्यानंतर ३ जानेवारी रोजी या विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली.
जागतिक आरोग्य संघटनेचे पथक आता या प्रकरणाची बारकाईने तपासणी करणार असून, त्यासाठी आमच्या तज्ज्ञांचे पथक चीनला जाणार आहे, असे संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी दिल्लीत सांगितले. हा संसर्ग खरोखरच प्राण्यांपासून माणसापर्यंत झाला का, वटवाघळांपासूनच याची सुरुवात झाली का, याची तपासणी आमचे तज्ज्ञ करणार आहेत.

याआधी अमेरिकेने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोना संसर्गाच्या निमित्ताने टीका केली होती. चीनने या विषाणुंच्या संसर्गाची माहिती अन्य देशांना दिली नाही आणि जागतिक आरोग्य संघटना तरीही चीनची बाजू घेत आहे, असा आरोप करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य संघटनेचा निधी बंद करण्याची घोषणा केली होती.

संसर्गाकडे गांभीर्याने पाहायला हवे
आपण अद्याप कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातच असून, दुसरा व मोठा टप्पा कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याची वाट न पाहता, आपण आतापासूनच त्याचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र तसे करताना सध्या ज्या वेगाने संसर्ग वाढत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक चक्र सुरळीत व्हायलाच हवे. त्यासाठी निर्बंध सरसकट शिथिल करून चालणार नाही. जिथे परिस्थिती गंभीर आहे, तिथे निर्बंध कडकच असायला हवेत. मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करायला हवे. अन्यथा फारच मोठे संकट निर्माण होईल, असे आरोग्य संघटनेच्या डॉ. मायकेल रेयॉन यांनी म्हटले आहे.

Web Title: coronavirus: WHO team to visit China for inspection Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.