Coronavirus : WHO चा कोरोना व्हायरसबाबत इशारा, अनेक देशांना 'ही' चूक न करण्याचा दिला सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:38 AM2020-06-30T11:38:50+5:302020-06-30T11:52:52+5:30

जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

Coronavirus : WHO warns world says Coronavirus infection worst situation yet to come | Coronavirus : WHO चा कोरोना व्हायरसबाबत इशारा, अनेक देशांना 'ही' चूक न करण्याचा दिला सल्ला!

Coronavirus : WHO चा कोरोना व्हायरसबाबत इशारा, अनेक देशांना 'ही' चूक न करण्याचा दिला सल्ला!

Next

जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. WHO कडून सांगण्यात आहे की, टअजून सर्वात वाईट स्थिती येणं बाकी आहे'. WHO चे मुख्य टेड्रोस एडहनॉम गिब्रयेसॉस म्हणाले की, जर जगभरातील सरकारांनी योग्य पावले उचलली नाही तर हा व्हाररस आणखी लोकांना संक्रमित करू शकतो. काही दिवसांपूर्वीच WHO कडून जगभरातील नेत्यांना कोरोनावरून राजकारण न करण्याचा इशारा दिला होता.

सोमवारी झालेल्या एका व्हर्चुअल मिटींगद्वारे त्यांनी सांगितले की, आपल्या सर्वांनाच वाटतं की, कोरोना व्हायरस लवकरात लवकर नष्ट व्हावा. सर्वांनाच आपल्या सामान्य जगण्याकडे परत यायचंय. पण कटूसत्य हेच आहे की, आपण अजूनही ही महामारी संपण्यापासून खूप दूर आहोत. त्यांना इशारा दिला की, वैश्विक स्तरावर महामारी पसरण्याचा वेग वाढला आहे.

कोरोनाची आणखी वाईट स्थिती येणं बाकी

टेड्रोस म्हणाले की, राष्ट्रीय एकतेत कमतरता, वैश्विक एकजुटतेत कमतरता आणि विभागलं गेलेलं जग कोरोना व्हायरसचा वेग वाढवत आहे. जर याला थांबवलं गेलं नाही तर आणखी वाईट स्थिती येणं बाकी आहे. त्यांनी यावेळी जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान सरकारांचं कौतुकही केलं. तसेच इतर देशांना या देशांच्या मार्गावर चालण्याचा आग्रह सुद्धा केलाय.

चीनला जाणार WHO ची टीम

कोरोना व्हायरस कुठून आला याचा शोध घेण्यासाठी WHO लवकरच आपली एक टीम चीनला पाठवणार आहे. पण या टीममध्ये कोण असेल याची माहिती सध्याच जाहीर करण्यात आलेली नाही. चीन आधीपासूनच कोरोना चीनमधून पसरला नसल्याचा दावा करत आहे. जगभरातून चीनवर टीका होत आहे. अशात दबावामुळे चीनने चौकशी टीमला परवानगी दिली असली तरी या चौकशीत चीन सरकारची पूर्ण मदत मिळते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

भय इथले संपत नाही! चीनमध्ये सापडला नवा व्हायरस; संपूर्ण जगात खळबळ

Web Title: Coronavirus : WHO warns world says Coronavirus infection worst situation yet to come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.