Coronavirus : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांच्या त्वचेचा रंग पडला काळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:41 PM2020-04-22T12:41:11+5:302020-04-22T12:42:43+5:30
कोरोना व्हायरसबाबत सतत काहीना काही नवीन माहिती समोर येत आहे. आता पुन्हा वुहानमधील दोन डॉक्टरांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पेइचिंग : कोरोना व्हायरसबाबत जगभरात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. बरे झालेले काही लोक पुन्हा कोरोनाचे शिकार होत असल्याचा दावा केला जात आहे. तर अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणेच दिसत नसल्याचे उघड झाले आहे. अशात चीनमधून एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथे कोरोना व्हायरसचे शिकार झालेल्या दोन डॉक्टरांच्या त्वचेचा रंग काळा पडलाय. ही अशाप्रकारची पहिलीच केस समोर आल्याचे सांगितले जात आहे.
मेट्रो या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 42 वर्षीय डॉक्टर यी फॉन आणि डॉ हू विफेंग वुहानच्या सेंट्रल हॉस्पिटलमधे रूग्णांवर उपचार करत असताना कोरोनाचे शिकार झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की, लिव्हर डॅमेज झाल्यावर हार्मोन्समध्येे असंतुलन झाल्यामुळे या दोघांच्या त्वचेचा रंग काळा पडला आहे.
डॉक्टर यी यांना साधारण 39 दिवसांपर्यंत लाइफ सपोर्ट मशीनवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा जीव वाचवण्यात आला. तर डॉक्टर विफेंग यांना बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. पण ते फार जास्त कमजोर झाले आहेत. दोघांच्या शरीराचा रंग पूर्णपणे बदलला आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसचा कहर सर्वातआधी चीनच्या वुहान शहरात बघायला मिळाला होता. त्यानंतर जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. दुसरीकडे चीनमध्ये डॉक्टरांना या वर्षांच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसची वॅक्सीन देण्याची योजना आहे.