चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 04:54 PM2024-08-14T16:54:16+5:302024-08-14T16:57:19+5:30

...गेल्या आठवड्यातच एक चिनी कंपनी हजारो मृतदेहांची  चोरी आणि ते विकण्याच्या घोटाळ्यात अडकली होती.

Corruption even in the case of the dead bodies in China; People make money by dismembering and selling dead bodies | चीनमध्ये मृतांच्या बाबतीतही भ्रष्टाचार; पैशांसाठी होतेय मृतदेहांची चोरी अन् विक्री

प्रतिकात्मक फोटो

चीनमध्ये मृतदेहांचा व्यापार होत असल्याचे वृत्त आहे. पैशांसाठी मृतदेहांची चोरी होत असून ते विकले जात आहेत. चिनी माध्यमांतील वृत्तांनुसार असे अनेक अधिकारी आणि व्यवस्थापनातील लोक आहेत, ज्यांनी अवैध शुल्क वसूल केले आहे. गेल्या आठवड्यातच एक चिनी कंपनी हजारो मृतदेहांची  चोरी आणि ते विकण्याच्या घोटाळ्यात अडकली होती.

चाइना डेलीच्या वृत्तानुसार, अनहुई, ग्वांगडोंग, जियांग्सू, जियांग्शी, जिलिन, लियाओनिंग, सिचुआन आणि युन्नान प्रांतांमध्ये अधिकाऱ्यांच्या तपासात अंत्यसंस्कार पार्लर आणि तत्सम संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी उल्लंघन केल्याचे अनेक आरोप केले आहेत. यात, वर्षाच्या सुसुवातीला चोकशी सुरू झाल्यानंतर, डझनावर प्रकरणं समोर आली असून ज्या लोकांना निशाणा बनवण्यात आले, त्यांपैकी अनेकांकडे उद्योगाचा चांगला अनुभव असल्याचे म्हणण्यात आले आहे. 

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, अनहुई, लियाओनिंग आणि जिलिनमध्ये भ्रष्टाचार विरोधातील मोहिमांनी बेकायदेशीर शुल्क आकारणाऱ्या अंत्यसंस्कार पार्लर सोबतच स्मशानभूमीचे बेकायदेशीर बांधकाम आणि कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला.

टोळीचा शोध सुरू -
चीनमध्ये अधिकारी स्मशान भूमी आणि लॅबमधून 4000 हून अधिक मृतदेह चोरणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. जेनेकरून त्यांच्या हाडांचा उपयोग डेंटल ग्राफ्टसाठी केला जाऊशकेल. अॅलोजेनिक ग्राफ्टचा वापर तेव्हाच केला जातो, जेव्हा रुग्णांकडे ग्राफ्टसाठी पुरेशसे घनत्व नसते. तथापि, अशी हाडे सहसा हिप रिप्लेसमेंट सारख्या ऑपरेशन्स करणाऱ्या रूग्णांच्या संमतीने घेतली जातात.

बिजिंगच्या एका लॉ फर्मच्या अध्यक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शांक्सीची राजधानी ताइयुआन पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. चिनी माध्यमांनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टोळी चोरी करत होती आणि पैशांसाठी मृतदेह दुसऱ्यांदा विकत होती. या प्रकरणी 70 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Corruption even in the case of the dead bodies in China; People make money by dismembering and selling dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.